Dhananjay Munde : पंचनामे कुठपर्यंत आलेत सरकार सांगेल का?, धनंजय मुंडे यांचा सवाल

Dhananjay Munde : पंचनामे कुठपर्यंत आलेत सरकार सांगेल का?, धनंजय मुंडे यांचा सवाल

Dhananjay Munde on Unseasonal rain : संपूर्ण राज्यभर सध्या अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. कुठं गारांचा पाऊस, तर कुठे वादळी पाऊस बरसत आहे. या पावसाने पुरती दाणादाण उडवली असून शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतला आहे. मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडत आहे. आजही बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. यामुळं ज्वारी आंबा, गहू, टरबुज, खरबुज यांसह अनेक पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, आता अवकाळी आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ घोषित करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली.

शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागते. मार्च महिन्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. या पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं होतं. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले होते. त्याची अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळं बळीराजा पुरता हताश झाला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी नुकसानीची भरपाई तात्काळ घोषित करावी, अशी मागणी केली. मुंडे यांनी ट्विट करत ही मागणी केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी आणि गारपीट! पुन्हा नुकसान! पंचनामे कुठपर्यंत आलेत सरकार सांगेल का? अवकाळी आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ घोषित करा मायबाप सरकार, असं लिहिलं आहे.

अशातच दुष्काळाच्या सावटात असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आभाळ दाटून येत असून अनेक ठिकाणी पावसाने आज पुन्हा एकदा गारांसह पाऊस बरसला. रात्री अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊसाने धुमाकूळ घातला असून हा पाऊस शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. आजही पावसाने हजेरी लावली. मुंडे यांनी आपल्या ट्विटवर काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गारांचे थर साचलेले दिसत आहेत.

शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग सुरू, परिसराच्या अर्थकारणाला गती

या पावसामुळे यामुळं शेतकऱ्यांच्या आंबा, ज्वारी, गहू, हरभरा, खरबुज, टरबुज यांहस भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शासनही हमीभाव देत नाही आणि अवकाळी पाऊसही जगू देत नाही. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारकडून कोणताही मदत होत नसल्यानं संतापही व्यक्त केला जातोय. लवकरात लवकर सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, सरकार आता शेतकऱ्यांनी काय मदत जाहीर करते, की बळीराजाच्या तोंडाला पानं पुसते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube