IndiGo : पाचव्या दिवशीही संकट कायम, मुंबई विमानतळावर इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द

IndiGo : सध्या देशात हवाई प्रवासातील संकट कायम आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगाला क्रू मेंबर्सची कमतरता भासत आहे.

IndiGo

IndiGo

IndiGo  : सध्या देशात हवाई प्रवासातील संकट कायम आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगाला क्रू मेंबर्सची कमतरता भासत आहे. गेल्या चार दिवसांत देशभरात 2000 हून अधिक इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शनिवारी, पाचव्या दिवशी, मुंबई विमानतळावरून निघणाऱ्या सर्व इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली. शिवाय, इतर मार्गांवरील विमान भाड्यात जवळपास 10 पट वाढ दिसून येत आहे.

तर दुसरीकडे तिरुअनंतपुरम विमानतळावरून तीन देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली. 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अहमदाबाद विमानतळावर सात आगमन आणि 12 प्रस्थान रद्द करण्यात आले.

इंडिगोच्या उड्डाणांच्या रद्दीकरणाबाबत, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापु (Ram Mohan Naidu Kinjarapu) म्हणाले, आमची तातडीची प्राथमिकता सामान्य स्थिती पुनर्संचयित करणे आणि प्रवाशांना सर्व शक्य मदत करणे आहे. आम्ही यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि FDTL नियम आणि वेळापत्रक नेटवर्कचे पालन करत आहोत. आम्ही याची सखोल चौकशी करू आणि सर्व विमान कंपन्यांनी योग्य खबरदारी घ्यावी याची खात्री करू.

इंडिगो विमान कंपनीची चौकशी होणार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांचा मोठा निर्णय

 चौकशीसाठी समिती स्थापन

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापु म्हणाले, चूक कुठे झाली आणि कोणाची चूक होती हे निश्चित करण्यासाठी आम्ही या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. आम्ही या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करू. ही बाब दुर्लक्षित राहू नये. आम्ही कठोर कारवाई करत आहोत जेणेकरून यासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याला किंमत मोजावी लागेल.

Exit mobile version