Amit Shah hits out at Congress over Tahawwur Rana’s extradition : मुंबईतील 26/11 या दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य आरोपी तहव्वूर राणा त्याला भारतात परत आणलं जात आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर प्रतिक्रिया दिली. तहव्वूर राणाला परत आणणं हे मोदी सरकारचं मोठं यश आहे. असं शाह म्हणाले.
नगर शहरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा तूर्तास स्थगित…’हे’ आहे कारण
अमित शाह यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना तहव्वूर राणा याचं प्रत्यार्पण हे मोदी सरकारच्या कूटनीतीचे यश असल्याचे सांगितलं. आम्हाला वाटतं की, भारताचा सन्मान, भारत भूमी आणि लोकांवर हल्ले करणाऱ्या लोकांना शिक्षा मिळावी, मात्र 2008 साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी जे लोक सत्तेमध्ये होते. त्यांनी राणाला भारतात आणून त्याच्यावर खटला चालू शकलेले नाही.
आम्ही कधीच बदलत नाही; ‘बापाचं नाव बदलण्याची वेळ’ म्हणणाऱ्या जलील यांना फटकारलं
दरम्यान सध्या अमेरिकेमध्ये असलेल्या दहशतवादी याला दिल्लीत आणले जात आहे. हे प्रत्यापण थांबवण्यासाठी तहव्वूर राणानी सर्व प्रयत्न केले. मात्र अखेर राणाला भारतात आणण्यात आला आहे. दिल्लीत आल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा त्याला ताब्यात घेतील आणि न्यायालयात हजर केले जाईल. मात्र अद्याप मुंबई पोलिसांना याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही की,राणाला मुंबईत कधी रवाना केला जाईल.