Amit Shah On Rahul Gandhi : एसआयआर आणि निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीने दिल्लीत रामलिला मैदानावर रॅली काढून सभा घेतली होती. या सभेत राहुल गांधींनी ( Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका केली होती. त्याविरोधात आता भाजपही मैदानात उतरले असून, इंडिया आघाडीविरोधात देशभरात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. हैदराबाद येथे झालेल्या रॅलीत अमित शाह यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. ‘दिल्लीतील रॅली ही मतं वाचवण्यासाठी नव्हे, तर घुसखोरांना वाचवण्यासाठी होती’, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर टिका केलीय.
प्रकृती बिघडल्याने शरद पवार रुग्णालयात दाखल, रुबी हॉल क्लिनिकने दिली महत्वाची माहिती
एकेका घुसखोराचे नाव मतदार यादीतून हटवणार: अमित शाह
अमित शाह म्हणाले की, राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कितीही प्रयत्न केले, तरी भाजप प्रत्येक घुसखोराला मतदार यादीतून बाहेर काढणार आहे. काँग्रेस आणि तिचे मित्रपक्ष एसआयआर प्रक्रियेला विरोध करत आहेत, कारण त्यांना मतदार यादीतील बांगलादेशी घुसखोरांना वाचवायचे आहे, असा आरोप शाहांनी केलीय. भाजपचे कार्यकर्ते एसआयआर प्रक्रियेच्या समर्थनार्थ ठामपणे उभे असल्याचे सांगत शाह यांनी देशात केवळ भारतीय नागरिकांनाच मतदानाचा अधिकार मिळेल, असे स्पष्ट केले.
‘निवडणुकीत हरले की ईव्हीएमला दोष’
निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत असल्याचा आरोपही अमित शाह यांनी केला.केरळ, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सरकारे कशी आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘ईव्हीएम एवढेच खराब असेल, तर निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर सरकारची शपथ का घेतली? जिंकले की जनतेने निवडून दिले म्हणायचे आणि हरले की निवडणूक प्रक्रियेला दोष द्यायचा’, अशा शब्दांत शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. यासाठी त्यांनी ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीचाही उल्लेख केला.
दोन स्टंपमधून चेंडू जायचा, तरी फलंदाज नाबाद! क्रिकेटमध्ये मिडल स्टंपची सुरुवात कशी झाली?
‘मतदार यादीत 30 कोटी बनावट मतदार?’
अमित शाह यांनी मतदार यादीत 30 कोटी मतदार अस्तित्वात नसल्याचा दावा केला आहे. हे 30 कोटी लोक कोण आहेत, असा सवाल करत त्यांनी हे घुसखोर असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांना अशा लोकांची नावे मतदार यादीतून हटवायची नसल्याचेही शाह म्हणाले. काँग्रेसच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात 12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेसमोर काँग्रेसची बरोबरी होऊ शकत नसल्याचे सांगत देशातील जनतेने काँग्रेसला नाकारल्याचा दावा शाह यांनी केला.
तेलंगणातही भाजप विजय मिळवणार : शाह
बंगाल आणि बिहारमध्ये भाजपने विजय मिळवला असून आता तेलंगणातही पक्ष विजय मिळवेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. सभेच्या सुरुवातीला त्यांनी माँ भाग्यलक्ष्मी यांना वंदन केले आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली.हैदराबाद भारताचा भाग बनवण्यात सरदार पटेल यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगत शाह यांनी निजामाच्या राजवटीचा उल्लेख केला.
