Download App

लोकसभेत राहुल गांधींना घेरताना अमित शाहांनी उल्लेख केलेल्या ‘कलावती’ कोण?

  • Written By: Last Updated:

Amit Shah Speech On No Confidence Motion : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (दि. 9) लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर कलावतींचा उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला. अमित शाहंनी उल्लेख केलेल्या कलावती नेमक्या कोण हे आपण जाणून घेऊया.

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना अनेक मुद्द्यांवरून घेरले. कलावतीचा उल्लेख करत अमित शाह यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला. शाह म्हणाले की, राहुल गांधी कलावती यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. त्यांच्या सरकारने (UPA) कलावतींसाठी काहीही केले नसून या उलट मोदी सरकारने कलावतींना घर, वीज आणि धान्य दिल्याचा उल्लेख केला.

PM मोदींना जादुची झप्पी ते थेट फ्लाइंग KISS; लोकसभेतील गाजलेले राहुल गांधींचे किस्से

अमित शाह म्हणाले, या सभागृहात एक असा नेता आहे ज्याला 13 वेळा लॉन्च केले गेले. मात्र, काँग्रेसच्या हाती काहीच आले नाही. 2008 मध्ये कलावतींच्या घरी राहुल गांधी जेवणासाठी गेले होते. पण त्यांच्या घरासाठी त्यांनी काय केले? असा प्रश्न शाह यांनी उपस्थित करत मोदी सरकारने कलावतींना घर, अन्न-धान्य आणि वीज देण्याचे काम केले असून, त्या आजही मोदींसोबत असल्याचे सांगितले.

संसद टीव्हीवर फक्त 4 मिनिटे दिसले राहुल गांधी! कॉंग्रेस खवळली

कोण आहेत कलावती?

राहुल गांधी 2008 मध्ये विदर्भातील जलका गावातील रहिवासी असणाऱ्या कलावती यांच्या घरी गेले होते. कलावतीचे पती शेतकरी होते. कर्ज न भरल्याने 2005 मध्ये त्यांनी आत्महत्या केली होती. कलावती यांचा उल्लेख करत राहुल यांनी संसदेत शेतकरी विधवांचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधींच्या उल्लेखानंतर कलावती या चर्चेत आल्या होत्या. मात्र, त्यानंतर राहुल गांधी किंवा काँग्रेसकडून कलावतींसाठी कोणत्याही उपाय योजना करण्यात आल्या नसल्याचे सांगत आज शाहंनी राहुल गांधींसह काँग्रेसला घेरले.

Tags

follow us