PM मोदींना जादुची झप्पी ते थेट फ्लाइंग KISS; लोकसभेतील गाजलेले राहुल गांधींचे किस्से

  • Written By: Published:
PM मोदींना जादुची झप्पी ते थेट फ्लाइंग KISS; लोकसभेतील गाजलेले राहुल गांधींचे किस्से

Rahul Gandhi Flyying Kiss Controversy : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर सध्या लोकसभेत चर्चा सुरू असून, खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधींनी सभागृहात पहिल्यांदा भाषण केले. यावेळी राहुल गांधींनी फ्लाईंग किस केलेल्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह एनडीएच्या अनेक महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्या भाषणानंतर फ्लाइंग किस केल्याचा आरोप केला आहे.

संसद टीव्हीवर फक्त 4 मिनिटे दिसले राहुल गांधी! कॉंग्रेस खवळली

राहुल गांधींच्या या कृत्याबद्दल लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारही करण्यात आली आहे. लोकसभेत राहुल गांधी वादग्रस्त कृती करण्याची ही पहिली वेळ नसून, याआधी राहुल गांधींनी PM मोदींना दिलेल्या जादुच्या झप्पीमुळे ते चर्चेत आले होते. 2018 च्या सुरुवातीला पावसाळी अधिवेशनात राहुल गांधींनी सहकारी खासदाराकडे बघून डोळा मारल्यामुळे तसेच सभागृहातच पंतप्रधान मोदींना मिठी मारल्याबद्दल वादात सापडले होते.

PM मोदींनी भर सभागृहात जादुची झप्पी

2018 मध्येही विरोधकांकडून केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला होता. या अविश्वास प्रस्तावातील चर्चेदरम्यानही राहुल गांधींनी भाषण करत माझ्या बोलण्यात तथ्य आहे, त्यामुळेच पंतप्रधान मोदी माझ्याशी नजरेला नजर मिळवण्यास टाळत असल्याचे म्हटले होते. तसेच यावेळी काँग्रसचा खरा अर्थ समजावून सांगितल्याबद्दल राहुल गांधींनी भाजप आणि RSS चे आभार मानले होते. यानंतर रहुल गांधी थेट उठून मोदींजवळ पोहोचले आणि त्यांना घट्ट मिठी मारत जादु की झप्पी दिली होती.

ज्योतिरादित्य सिंधियांना मारला डोळा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारल्यानंतर राहुल गांधी पुन्हा त्यांच्या जागेवर येऊन बसले. यावेळी त्यांनी शेजारी बसलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे बघत डोळा मारला त्यावेळी सिंधिया काँग्रेसमध्ये होते.

आजच्या फ्लाइंग किसमुळे पुन्हा आले चर्चेत

मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाच्या चर्चेचा आजचा दुसरा दिवस असून, सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधींचे भाषण झाले. भाषण झाल्यानंतर सभागृहात राहुल गांधींनी फ्लाइंग किस केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह एनडीएच्या अनेक महिला खासदारांनी केला आहे.

Smriti Irani : जर गांधी कुटुंबात हिंमत असेल तर.. राहुल गांधींच्या भाषणानंतर स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात

स्मृती इराणी म्हणाल्या की, “माझा एका गोष्टीवर आक्षेप आहे. ज्यांना माझ्यापूर्वी बोलण्याची संधी देण्यात आली होती, त्यांनी सभागृहातून जाण्यापूर्वी असभ्य वर्तन केले. महिला असलेल्या खासदार महोदयांना फ्लाइंग किस देऊन निघून गेले. हे वर्तन देशाच्या सर्वोच्च सभागृहात कधीच पाहायला मिळाले नव्हते. हे नेमके कोणत्या खानदानाचे लक्षण आहे, हे संपूर्ण देश बघत आहे, असंही त्या म्हणाल्या.

आज सभागृहात नेमके काय घडले?

विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज (दि. 9) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. त्यांच्या भाषणानंतर भाजपकडून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर देत काँग्रेसवर तुफान हल्ला चढविला.

यावेळी बोलताना स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला. राहुल गांधींनी असभ्य हावभाव केले. सभागृहातून बाहेर पडताना त्यांनी फ्लाइंग किसचे इशारे आणि हावभाव केले, असा आरोप इराणी यांनी केला. या घटनेबाबत भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनीही सभापती ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. या आरोपांमुळे संसदेतील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube