Smriti Irani : जर गांधी कुटुंबात हिंमत असेल तर.. राहुल गांधींच्या भाषणानंतर स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात

Smriti Irani : जर गांधी कुटुंबात हिंमत असेल तर.. राहुल गांधींच्या भाषणानंतर स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात

Smriti Irani criticized Rahul Gandhi : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप सदस्यांनी गदारोळ घातला. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. तर खासदार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर देत काँग्रेसवर तुफान हल्ला चढविला.

यांच्याच आघाडीतील एका नेत्यानं म्हटलं होतं की भारताचा अर्थ केवळ उत्तर भारत आहे. राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या साथीदाराच्या वक्तव्याचे खंडन करावे. काँग्रेसच्या नेत्याने काश्मिरात जनमत चाचणी घेण्याचे वक्तव्य केले होते. जम्मू काश्मिरला भारतापासून वेगळे करण्याचे वक्तव्य करणारा नेता काँग्रेसमध्ये का आहे, गांधी कुटुंबात हिंमत असेल तर त्यांनी याचे खंडन करून दाखवावे, असे आव्हान स्मृती इराणी यांनी दिले.

Video : मणिपुरात भारतमातेची हत्या, संसदेत राहुल गांधींचा मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल

काय म्हणाले राहुल गांधी?

मणिपूरमध्ये भाजपच्या राजकारणाने भारताची हत्या केली आहे, त्यांनी भारताची हत्या केली आहे, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून संसदेत चांगलाच गदारोळ झाला. राहुल गांधींच्या या विधानानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारच्यावतीने उभे राहत या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. मणिपूरमध्ये सरकारने भारताचा आवाज मारला म्हणजे भारत मातेची हत्या केली असून, तुम्ही देशद्रोही आहात, मणिपूरमध्ये तुम्ही देशाचा खून केला आहे, असा अत्यंत गंभीर आरोप सरकारवर केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube