Video : मला माहितीये विरोधक विधेयक पास होऊ देणार नाहीत; मतदानापुर्वीच अमित शहांनी लावला निकाल

काही संसदीय मतदारसंघांमध्ये ३९ लाख मतदार आहेत. संविधानानुसार सरकारला असं करण्याचा अधिकार आहे.

News Photo   2026 04 17T185426.584

मला माहितीये विरोधक विधेयक पास होऊ देणार नाहीत; मतदानापुर्वीच अमित शहांनी लावला निकाल

लोकसभेत मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला (Loksabha) आरक्षणावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी यावर लोकसभेत भाष्य केलं. यावेळी अमित शाह म्हणाले, या विधेयकाचा उद्देश महिला सक्षमीकरण आहे असं म्हणत शहा यांनी चर्चेला उत्तर दिली.

काही संसदीय मतदारसंघांमध्ये ३९ लाख मतदार आहेत. संविधानानुसार सरकारला असं करण्याचा अधिकार आहे. जे लोक जागावाढीला विरोध करत आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावं की ते अनुसूचित जाती-जमातींच्या जागावाढीलाही विरोध करत आहेत. संविधानात मतदारसंघ पुनर्रचनेची तरतूद आहे असंही ते म्हणाले.

Video : न तो मुझे और ना ही प्रधानमंत्री को कोई ‘वाइफ़ इश्यू; है! राहुल गांधींच्या भाषणातील 10 मुद्दे

देशातील जनता निर्णय घेते. ते सदस्यांना निवडून सभागृहात पाठवतात. मतदारसंघ पुनर्रचनेच्यावेळी रस्ते, रेल्वे इत्यादींच्या स्थितीवरही सभागृहात चर्चा होईल. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने ही घटनात्मक सुधारणा आणली आहे. १९७१ मध्ये काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी जागांची संख्या गोठवण्यात आली होती. १९७१ पासून आतापर्यंत जागांची संख्या गोठवलेलीच राहिली आहे.

२० लाखांपेक्षा जास्त मतदार असलेल्या १२७ जागा आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने मतदार असलेली लोकसभेची जागा कोणताही खासदार व्यवस्थितपणे कशी सांभाळू शकतो असंही शहा यावेळी म्हणाले आहेत. परंतु इंडी अलायन्सच्या सर्व सदस्यांनी या विधेयकाला विरोध केला. अनेक ठिकाणी असं दिसून आलं की, विरोधी पक्ष आमच्या दृष्टिकोनाऐवजी अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करत होता असंही ते म्हणाले.

Exit mobile version