Video : न तो मुझे और ना ही प्रधानमंत्री को कोई ‘वाइफ़ इश्यू’ है! राहुल गांधींच्या भाषणातील 10 मुद्दे
Rahul Gandhi माझ्या बहिणीने (प्रियंका) चक्क गृहमंत्री अमित शाह यांना हसवले जे मी 20 वर्षांत करू शकलो नाही.
Rahul Gandhi Speech In Parliament : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस राहुल गांधींच्या धडाकेबाज भाषणाने गाजवाला. महिला आरक्षण आणि परिसीमन (Delimitation) या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर तीव्र शब्दांत प्रहार केला. हे महिला आरक्षण विधेयक नसून, महिलांच्या आडून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा हा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यांच्या भाषणामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला, मात्र या गोंधळातही राहुल गांधींनी 10 प्रमुख मुद्द्यांच्या आधारे सरकारला धारेवर धरले.
Raj Thackeray : आरक्षणाची ढाल अन् उत्तरेचं ‘प्रमोशन’; राज ठाकरेंनी काढले भाजपचे वाभाडे!
राहुल गांधींच्या भाषणातील 10 मुख्य मुद्दे
1. कौटुंबिक टिप्पणी आणि सस्पेन्स : राहुल गांधींनी भाषणाची सुरुवात एका मिश्किल टिप्पणीने केली. ते म्हणाले, “न मला, ना पंतप्रधानांना कोणताही ‘वाईफ इश्यू’ आहे.” या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला, मात्र त्यानंतर त्यांनी लगेच विषयाच्या गांभीर्याकडे लक्ष वेधले.
2. प्रियंका गांधींचे कौतुक : बहिणीचा उल्लेख करत राहुल म्हणाले, “माझ्या बहिणीने (प्रियंका) ते करून दाखवले, जे मी 20 वर्षांत करू शकलो नाही. काल त्यांनी चक्क गृहमंत्री अमित शाह यांना हसवले.” प्रियंका यांची बोलण्याची शैली आपल्याला खूप आवडते, असेही त्यांनी नमूद केले.
3. महिलांचे महत्त्व : महिला भारताच्या ‘राष्ट्रीय कल्पनेच्या’ (National Imagination) केंद्रस्थानी आहेत. समाजाला आणि देशाला घडवण्यात महिलांची भूमिका निर्णायक आहे. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या महिलेकडून प्रभावित होऊनच मोठे झालो आहोत, असे भावनिक विधानही त्यांनी केले. Rahul Gandhi Speech In Parliament
4. निवडणूक नकाशा बदलण्याचा डाव : राहुल गांधींनी थेट आरोप केला की, हे महिला आरक्षण बिल नाहीच, याचा महिला सक्षमीकरणाशी काहीही संबंध नाही. 2023 मध्ये जे पास झाले होते, ते खरे बिल होते. हे नवीन विधेयक म्हणजे महिलांच्या आडून भारताचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे. जुनं बिल आणा आम्ही समर्थन करू.
5. सरकारच्या भीतीवर बोट : तुम्हाला भीती वाटतेय की देशाच्या राजकारणात नक्की काय घडतंय? तुमची ताकद कमी होत चालली आहे आणि म्हणूनच तुम्ही आसामप्रमाणे निवडणूक नकाशा बदलू पाहत आहात. पण संपूर्ण विरोधी पक्ष हे प्रयत्न हाणून पाडेल.
LIVE: Shri @RahulGandhi | The Constitution (One Hundred and Thirty-First Amendment) Bill, 2026 | Lok Sabha. https://t.co/CNUwLCPwFt
— Congress (@INCIndia) April 17, 2026
6. ओबीसी हक्कांचा प्रश्न : राहुल गांधींनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरले. तुम्ही त्यांना (ओबीसी) हिंदू म्हणता, पण त्यांना त्यांचा हक्क देत नाही. उद्योग, न्यायपालिका आणि खासगी क्षेत्रात दलित कुठे आहेत? आम्ही ओबीसींचा हक्क हिरावून घेऊ देणार नाही, असा पवित्रा यावेळी त्यांनी घेतला.
7. पंतप्रधानांवर निशाणा : पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत राहुल म्हणाले, कालच्या पंतप्रधानांच्या भाषणात ऊर्जा नव्हती, प्रभाव नव्हता. काल 16 एप्रिल होती आणि तुमच्या सर्व समस्यांचे उत्तर ’16’ मध्येच दडलेले आहे.
8. विपक्षाची एकजूट: राहुल गांधींनी सरकारला आव्हान दिले की, संपूर्ण विरोधक एकत्र येऊन सरकारचे हे विधेयक अपयशी ठरवतील. 2023 मध्ये जे विधेयक आले होते ते योग्य होते, पण आताचे विधेयक फसवणूक आहे असे ते म्हणाले.
9. ‘शर्मनाक कृत्य’: भारताच्या महिलांच्या नावाखाली निवडणूक नकाशा बदलणे हे अत्यंत ‘शर्मनाक कृत्य’ असल्याचे राहुल गांधींनी सभागृहात ठणकावून सांगितले.
10. जाती जनगणनेचा मुद्दा : सरकारने जाती जनगणनेचा मुद्दा जाणीवपूर्वक बाजूला सारल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. ओबीसी बांधवांना अधिकार देण्यापासून सरकार पळ काढत असून, त्यांचा हक्क हिरावून घेणे हाच सरकारचा खरा अजेंडा असल्याचा दावा त्यांनी केला.
मोदी सरकारने महिला आरक्षणाबाबची अधिसूचना मध्यरात्री का काढली? समजून घ्या सोप्या भाषेत
सरकारला हरवण्याचा दावा
राहुल गांधींनी आपल्या भाषणादरम्यान एक मोठा दावा केला की, “पुढच्या 45 मिनिटांत आम्ही सरकारला हरवून दाखवू.” त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी बाकावरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. किरण रिजिजू यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राजीव गांधींनी ओबीसी आरक्षणाला विरोध केल्याची आठवण करून दिली. मात्र, राहुल गांधींनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत सरकारला निवडणूक नकाशा बदलण्यापासून रोखण्याचा निर्धार व्यक्त केला.
BRUTAL BY RAHUL GANDHI 🔥
“Neither I nor PM Modi have wives, so we don’t get feedback from that perspective
But I have my mother & sister 😂
Yesterday my sister did something in 5 years which I couldn’t do in 20 years — to make Amit Shah smile 🤣”
LoP Rahul Gandhi trolls both… pic.twitter.com/ALyhbgLx61
— Ankit Mayank (@mr_mayank) April 17, 2026