एक विद्यार्थी, दुसरे मूर्ख अन् तिसरे मूर्खाला देव मानणारे अंधभक्त; राहुल गांधींचा भाजपसह समर्थकांना जोरदार टोला
Rahul Gandhi राहुल गांधी यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढत विद्यार्थ्यांची बाजू मांडली.
Rahul Gandhi on Public Examinations Prevention of Unfair Means Amendment Bill in Loksabha : संसदेचं पावसाळी अधिवशेन सुरू आहे. त्यामध्ये सध्या देशाभरामध्ये सुरू असलेल्या नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने सार्वजनिक परीक्षांमधील अनुचित प्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक आणलं आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. त्यावर आज लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढत विद्यार्थ्यांची बाजू मांडली.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
जंतरमंतरवरील आंदोलन हा तरूणांनी केलेला हिंसाचार नव्हता, तर ती फक्त एक तरूणांची फक्त प्रतिक्रिया होती. त्यामुळे त्यांच्यावर लाठीमारा ऐवजी त्यांचा आदर होणे गरजेचे होते. कारण ते मुलं म्हणाले, आमच्यासाठी माणूसकीच सर्वोच्च आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा सर्वांना अभिमान असला पाहिजे. त्यातील एक विद्यार्थीनी म्हणाले जे आमच्या आंदोलनाचा आदर करत नाहीत ते मूर्ख आहेत. कारण जगात दोन विद्यार्थ्यांचे प्रकार आहेत एक शिकणारा आणि दुसरा न ऐकणारा मुर्ख. त्यावर सत्ताधारी खासदारांनी गोंधळ घातला असता राहुल गांधी म्हणाले हे तुम्हाला नाही बोलत.
AI नियंत्रणाबाहेर, ऑल्टमन यांची कबुली; 11000 एक्सपर्टचं मदतीसाठी ट्रम्प यांना साकडं
तसेच पुढे राहुल गांधी म्हणाले की, या आंदोलनाशी भाजपच्या नेत्यांची मुलं देखील सहमत असतील. यावेळी राहुल गांधी यांनी आंदोलनातील विद्यार्थीनीशी साधलेला संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले तिने मला विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त या तीन कॅटेगिरीतील लोक कसे असतात. ते सांगितलं त्यात ती म्हणाली की, अंदभक्त हे ज्यांनी हे मान्य केलेलं असतं की, जे मूर्ख कॅटेगिरीतील लोक आहेत. तेच देव आहेत. असं म्हणत राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि मोदी शाहंना टोले लगावले आहेत.