मम्मी डॅडीच्या जागी मुलं म्हणू लागली अम्मी-अब्बू, पालकांची जिल्हा दंडाधिकांऱ्यांकडे धाव

Ammi Abbu in English Book: देहरादूनमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील शाळेच्या एका इंग्रजीच्या पुस्तकातील शब्दावरुन वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात मम्मी-डॅडीच्या (Mummy-Daddy) जागी अब्बू-अम्मी (Abbu-Ammi) छापण्यात आले असल्याने वाद निर्माण झाला आहे. पुस्तकात छापलेल्या अब्बू-अम्मी शब्दांमुळे मुलं घरी आल्यानंतर अब्बू-अम्मी बोलू लागले आहे. यामूळे काही पालकांनी थेट जिल्हा दंडाधिकांऱ्यांची भेट घेत […]

Untitled Design   2023 04 07T152921.604

Untitled Design 2023 04 07T152921.604

Ammi Abbu in English Book: देहरादूनमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील शाळेच्या एका इंग्रजीच्या पुस्तकातील शब्दावरुन वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात मम्मी-डॅडीच्या (Mummy-Daddy) जागी अब्बू-अम्मी (Abbu-Ammi) छापण्यात आले असल्याने वाद निर्माण झाला आहे. पुस्तकात छापलेल्या अब्बू-अम्मी शब्दांमुळे मुलं घरी आल्यानंतर अब्बू-अम्मी बोलू लागले आहे. यामूळे काही पालकांनी थेट जिल्हा दंडाधिकांऱ्यांची भेट घेत याबाबत तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात दखल घेत जिल्हा दंडाधिकारी सोनिका यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नेमके प्रकरण काय? जाणुन घ्या
देहरादूनमधील आयसीएससी बोर्डाच्या दुसरीच्या वर्गातील इंग्रजी पुस्तकातील एका धड्यात पालकांच्या जागी अम्मी-अब्बू हे शब्द छापण्यात आले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या पुस्तकातील पालकांचा उल्लेख अम्मी आणि अब्बू केल्याने आमचा मुलगा आम्हाला घरी अम्मी आणि अब्बू या नावानेच आवाज देऊ लागला आहे. याबाबत एका विद्याथ्याचे वडील मनीष मित्तल यांनी जिल्हा दंडाधिकारी सोनिका यांच्यांकडे तक्रार दाखल केली आहे.

पालक मनीष मित्तल यांच्या तक्रारीनंतर इंग्रजी पुस्तकातील त्या धड्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्या पुस्तकात अम्मी व अब्बू छापल्याचे दिसले. त्यावेळी पालकांनी जिल्हा दंडाधिकारी यांना सांगितले की, असा मजकूर काढून टाकावा किंवा इंग्रजी भाषेनुसार मदर-फादर (Mother – Father) असे शब्द लिहावेत. पालकांच्या तक्रारीनंतर जिल्हा दंडाधिकारी सोनिया यांनी मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा तपास सोपवला. त्यावेळी प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार यांनी पुस्तकातील तो मजकूर वाचला असून, आमिर हे पात्र अम्मी-अब्बू बोलत असल्याते त्यांनी सांगितले.

ट्विटरचा लोगो पुन्हा बदलला, श्वानाच्या जागी आता…

दरम्यान ओरिएंट ब्लॅक स्वान, हैदराबादने प्रकाशित केलेल्या ‘गुल मोहर’ या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात आईला अम्मी, तर वडिलांना अब्बू असे लिहिले आहे, असे मुलाचे वडील सांगतात. आई-वडील हा शब्द हिंदी पुस्तकात, उर्दू पुस्तकात अम्मी-अब्बू वापरावा, असे वडील सांगतात.

मोबाईलची चार्जिंग 100 टक्के आहे धोक्याची

वडील पुढे म्हणाले की, इंग्रजी पुस्तकात अम्मी-अब्बूचा वापर चुकीचा आहे. केवळ डेहराडूनमध्येच नव्हे तर देशातील अनेक भागात हे पुस्तक वाचले जात असल्याचे ते सांगतात. ही चुकीची प्रथा असून ती बंद व्हायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे. धर्मविरोधी कृत्ये थांबवण्यासाठी कारवाईची मागणी मुलाच्या वडिलांनी केली आहे.

Exit mobile version