वेगवेगळ्या खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमधील पोलीस ठाण्यावर हल्ला करणारा पंजाब पोलीस वारिस पंजाब दे या संघटनेचा चीफ आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला सहाव्या दिवशीही पोलीस अटक करू शकलेले नाही. मागील काही दिवसांपासून पोलीस त्याच्या पाठलाग करत आहेत. मात्र, पोलिसांना चकवा देऊन तो फरार होत राहिला. दरम्यान, अमृतपाल सिंग दुसऱ्या राज्यात पसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पंजाबनंतर देशभरातील पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. आता पोलिसांना अमृतपाल हा त्याच्या सहकाऱ्यांसह नांदेडमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे
पोलिस सूत्रांवर विश्वास ठेवला तर अमृतपाल हा पंजाबमधून पळून गेला आहे. तो उत्तराखंडध्ये असल्याचा पोलिसांना संशय आहे. पंजाबमधून पळून तो हरियाणाला गेला होता. 19 आणि 20 मार्च रोजी कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शाहबाद येथे मुक्काम केला होता. अमृतपाल तिथं कोणाच्या घरी राहिला होता, याची पोलीस चौकशी करत केली. तो एका महिलेच्या घरी राहिला होता. दरम्यान, अमृतपाल या महिलेला ओळखत होता की तो जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसला होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
काही दिवसांआधी जालंधरमध्ये पोलिस त्याचा पाठलाग करत होते. मात्र, पोलिसांना चकवून तो पसार झाला. तेव्हा पासून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याला शोधण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र, अमृतपाल सिंग हा अद्यापही फरार आहे. पंजाब पोलिसांनी शोधमोहिम राबवली आहे. पंजाबच्या पोलिस महासंचालकांनी त्याचा शोध घेण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. अशातच अमृतपाल महाराष्ट्रातील नांदेडमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पंजाब पोलिसांचे पथक तेथे छापा टाकण्यासाठी रवाना झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून त्यांना तपास वाढवाला. नांदेडमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांवर पोलीस बारीक नजर ठेवत आहेत. महाराष्ट्र विरोधी पथकांना स्थानिक पातळीवर देखरेख वाढवली आहे.
“…तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील” काँग्रेसकडून भाजपला इशारा
पंजाबच्या शेजारील राज्यांव्यतिरिक्त उत्तराखंडमध्येही अमृतपालसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमृतपालचा सहकारी तजिंदर सिंग उर्फ गोरखा बाबा याला लुधियानामध्ये अटक करण्यात आली आहे. तो अमृतपालचा गनर आहे. त्याची चौकशी केली असताा, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांना समजले की अमृतपालला 158 विदेशी खात्यांमधून पैसे दिले जात होते. त्यापैकी 28 खात्यांमधून 5 कोटींहून अधिक रक्कम अमृतपाल याला पाठवण्यात आली. अमृतपालचे अनेक युवतींशी प्रेमसंबंध होते. सोशल मीडियावर तो अनेक युवतींशी चॅट करायता आणि त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करायचा, अशी माहिती आहे.