Download App

मोठी बातमी : उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेचा आणखी एक अपघात; मालगाडी पटरीवरून घसरली

शनिवारी अमरोहा येथे रेल्वे अपघात घडला आहे. मुरादाबादहून दिल्लीकडे जाणारी मालगाडी अमरोहा रेल्वे स्टेशनजवळ पटरीवरून घसरली आहे.

  • Written By: Last Updated:

Amroha Rail Accident: उत्तर प्रदशेमध्ये गेल्या तीन दिवसांत दोन रेल्वे अपघात झाले आहेत. गोंडा (Gonda) येथे चंडीगड-डिब्रूगड एक्स्प्रेस पटरीवरून घसरून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडल्यानंतर शनिवारी अमरोहा येथे रेल्वे अपघात घडला आहे. मुरादाबादहून दिल्लीकडे जाणारी मालगाडी अमरोहा रेल्वे स्टेशनजवळ पटरीवरून घसरली आहे. दहा डब्बे उलटले आहे. दोन डब्ब्यांमध्ये केमिकल भरलेले होते. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

जोरदार स्फोट झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोटामुळे रेल्वे पटरीचे मोठे नुकसान झाले आहे. तर दिल्ली आणि मुरादाबादकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्यात. हा अपघात कशामुळे झाला आहे, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाहीत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी दुर्घटनेच्या ठिकाणी गर्दी केली होती.

follow us