Download App

धक्कादायक! सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर केला गोळीबार, लॉरेन्स बिश्नोई गँगने दिला गंभीर इशारा

हरियाणातील डबवालीमधील सावंतखेडा या गावात सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर काही लोकांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

  • Written By: Last Updated:

Sidhu Moose Wala Statue Firing : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची 2022 साली (Firing) गोळ्या झाडून हत्या झाली. त्यानंतर मूसेवालाच्या हत्येवर केंद्र सरकार, पंजाब सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा मोठी घटना घडली आहे. या घटनेवर सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर हिने माझ्या मुलाच्या मृत्यूचा हा अवमान असल्याची भावना व्यक्त केली आहे.

हरियाणातील डबवालीमधील सावंतखेडा या गावात सिद्धू मूसेवालाचा एक पुतळा आहे. या पुतळ्यावर काही लोकांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पुतळ्याची उभारणी जननायक जनता पार्टी म्हणजेच जेजेपी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिग्विजय चौटाला यांनी केली होती. हा प्रकार समोर आल्यामुळे सावंतखेडा गाव तसंच इतर भागात सध्या तणावाचं वातावरण आहे.

Salman Khan : सिद्धू मुसेवालाप्रमाणेच भाईजानचा ‘गेम’; पोलिसांकडून दोषारोपपत्रात धक्कादायक खुलासे

हा गोळीबार म्हणजे सिद्धू मूसेवालाच्या आत्म्यावर हल्ला आहे. तसंच, हा गोळीबार म्हणजे माझ्या मुलाच्या मृत्यूचा अवमान आहे, असंही त्यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत दु:ख व्यक्त केलंय. माझा मुलगा या जगात नाही. तरीदेखील त्याच्या शत्रूंना शांती मिळत नाहीये, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केलीय.

सिद्धू मुसेवालाच्या पुतळ्यावर गोळीबार झाल्यावर लगेच एका परदेशी मोबाईल क्रमांकावरून चौटाला यांना एक व्हिडीओ पाठवण्यात आला. या व्हिडीओत पुतळ्यावर गोळीबार केल्याचा व्हिडीओ पाठवण्यात आला. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्वोई गँगने घेतली आहे. तसंच, मूसेवाला याच्या विचारांचे जो कोणी समर्थन देईल त्याला यापुढे लक्ष्य केले जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. डबवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी चालू केली आहे.

दरम्यान, सिद्धू मूसेवाला या प्रसिद्ध गायकावर 29 मे 2022 रोजी गोळीबार झाला होता. पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात तो कारमध्ये बसून जात होता. याचवेळी त्याला मध्येच अडवून त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या दुर्घटनेत त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता.

follow us