Goldy Brar Death : सिद्धू मूसेवालाचा मारेकरी गोल्डी ब्रारची हत्या; अमेरिकेत घातल्या गोळ्या

Goldy Brar Death : सिद्धू मूसेवालाचा मारेकरी गोल्डी ब्रारची हत्या; अमेरिकेत घातल्या गोळ्या

Goldy Brar : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोल्डी ब्रारची हत्या झाल्याची घटना घडलीयं. अमेरिकेत गोळ्या झाडून गोल्डी ब्रारची हत्या (Goldy Brar) करण्यात आली आहे. ब्रारच्या हत्येची जबाबदारी डल्ला-लखबीर टोळीने घेतली असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलीयं.

Covishield लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या अन् हार्ट अटॅक! सर्वोच्च न्यायालयात याचिका, कंपनीचीही कबुली?

कोण आहे गोल्डी ब्रार :
गोल्डीचे खरं ना सतींदरजीत सिंग असून तो पंजाबमधील मुक्तसर साहिब जिल्ह्यातील रहिवासी आहे. गोल्डीचा जन्म 1994 साली झाला असून गोल्डी ब्रारचे वडील पोलिस खात्यात अधिकारी आहेत. चंदीगढमध्ये चुलत भाऊ गुरलाल ब्रारच्या हत्येनंतर त्याने गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला. गुरलाल ब्रार पंजाब विद्यापीठातील विद्यार्थी नेते होते. त्यांची 11 ऑक्टोबर 2020 ला चंदीगढमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

दिल्लीत शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांना शाळांमधून बाहेर काढलं

गुरलाल ब्रार हे लॉरेन्स बिश्नोईचा निकटवर्तीय होते. गुरलाल यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून धुमाकूळ घालण्यात आला होता. आता नवं युद्ध सुरु झालं असल्याचं बिश्नोई गॅंगकडून लिहिण्यात आलं होतं.

देशातील अनेक विमानतळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, महाराष्ट्रातील ‘या’ शहरांचा समावेश

गोल्डी ब्रार कॅनडामध्ये शिकण्यासाठी गेला होता. गुरलालच्या हत्येनंतर त्याने गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला. गोल्डीने कॅनडामधूनच हत्येचा कट आखण्यात सुरुवाती केली. त्याने गुंडांच्या मदतीने अनेक घडना घडवून आणल्या होत्या.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, प्रॉपर्टी डीलर्ससाठी कसा असेल ‘मेष’ राशीचा आजचा दिवस ?

18 फेब्रुवारी 2021 ला गोल्डीने पंजाबच्या फरीदकोट युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंग यांची गोळ्या घडवून आणली होती. गोल्डीने भावाचा बदला घेण्यासाठीच ही हत्या केली होती. त्यानंतर 29 मे 2020 ला पंजाबच्या मानसामधील जवाहरकेजवळ पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या केली. या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रारने घेतली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube