माजी आमदाराच्या हत्येसाठी सिद्धू मुसेवाला पॅटर्न; भाजपच्या माजी आमदाराचा हात !
Nafe Singh Rathi Murder: तुम्हाला नक्की आठवत असेल पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या कशी झाली. आलिशान वाहनात येऊन परदेशी बंदुकांचा वापर करून सिद्धू मुसेवाला याला संपविण्यात आले. कॅनाडात असलेल्या गॅंगस्टर गोल्डी बराड आणि लॉरेन्स बिश्नोई याने ही घडवून आणले. राजकारण आणि अंतर्गत टोळी युद्धातून ही हत्या झाली होती. वर्षानंतर हे आठविण्याचे कारण म्हणजेच दोन दिवसांपूर्वी हरियाणातील इंडियन नॅशनल लोक दल ( INLD) चे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार नफेसिंग राठी Nafe Singh Rathi) यांची हत्या. या हत्येमागे भाजपच्या (BJP) माजी आमदार व त्यांच्या कुटुंबाचा हात असल्याचे समोर येत आहे. हा आमदार कोण आहे. हत्या कशी घडवून आणली, हत्याचे कारण काय आहे हे आपण जाणून घेऊ…
मनोज जरांगे पाटील एवढे ‘फ्रस्टेड’ का झालेत?
हत्या कशी झाली ?
रविवारी माजी आमदार नफेसिंह राठी हे बाराही गावातून बहादूरगड येथे जात होतो. राठी यांच्याबरोबर तीन खासगी अंगरक्षक होते. त्यांच्याकडे बंदुका होत्या. तसेच भाचाही बरोबर होता. बाराही रेल्वे क्रॉसिंगजवळ नफेसिंग राठी यांची गाडी थांबली. पाठलाग करत पाठीमागील कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी नफेसिंह राठी यांच्या वाहनावर बेछूट गोळीबार सुरू केला. त्यात राठी आणि त्यांचा एक अंगरक्षकांना गोळ्या लागल्या. उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. नफेसिंह राठी हे जाट नेता आहेत. ते बहादूरगडमधील जाटवाडा गावातील आहे. ते 1996 ते 2005 या कालावधीत बहादूरगड आमगदार होते. राठी यांनी जीवाला धोका असल्याने राज्य सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. परंतु ती नाकारण्यात आली होती. मुसेवाला हत्याकांडातही अत्याधुनिक शस्त्र वापरण्यात आले होते. या गुन्ह्यातही असेच घडले आहे. त्यामुळे मुसेवाला हत्याकांड घडविणाऱ्या बिश्नोई गँगने ही हत्या घडविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृद्टीने तपास सुरू आहे.
भाजपाचा माजी आमदाराचा हात, राठीचे नातेवाइकही अडकले
नफेसिंह राठी यांच्या हत्येप्रकरणात भाजचे माजी आमदार नरेश कौशिक व त्याचा मुलासह इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राठी यांचा भाचा राकेश यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तर माजी मंत्री मांगेराम राठी यांचे मुलगा शतीश राठी, नातू गौराव व राहुल यांच्यालह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नफेसिंह राठी यांच्या भाऊ यात सहभागी आहे. तसा आरोप नफेसिंह राठी यांचा मुलगा जितेंद्र राठी याने केला आहे.
जमिनाचा वादातून हत्याकांड ?
माजी मंत्री मांगेराम राठी यांचा मुलगा जगदीश नंबरदारने गेल्या वर्षी आत्महत्या केली होती. नफेसिंह याने त्याच्या जमिनीवर कब्जा केला होता. जगदिशने आत्महत्या पूर्वी ऑडिओ क्लिप बनविले होते. त्यात नफेसिंह राठी यांच्यावर आरोप केला होता. नफेसिंह राठीविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्या वादातून सुपारी देऊन शॉर्प शूटर्सकडून ही हत्या घडवून आणली आहे. त्यासाठी मुसेवाला हत्याकांडात वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रासारखा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय बिश्नोई गॅंगवरच आहे. त्यामुळे आता पोलिस तपासात पुढे हे हत्याकांड कुणी घडवून आणले नेमकं कारण काय हे समोर येईलच.
चव्हाणांनंतर काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का : कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा राजीनामा