चव्हाणांनंतर काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का : कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा राजीनामा

चव्हाणांनंतर काँग्रेसला मराठवाड्यात आणखी एक मोठा धक्का : कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा राजीनामा

पुणे : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora), माजी मंत्री बाबा सिद्दकी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यानंतर राज्यात काँग्रेसला (Congress) आणखी एक मोठा धक्का बसला आहे.  माजी मंत्री आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील (Basavaraj Patil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसचा ‘हात’ सोडला आहे. येत्या दोन दिवसांत ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. (Former Minister and State Working President of Congress Basavaraj Patil has resigned from his post and left the Congress.)

मागील काही दिवसांपासून बसवराज पाटील हे देखील भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. लातूरमधील औसा मतदारसंघातून भाजपच्या अभिमन्यू पवार यांनी त्यांचा विधानसभेला पराभव केला होता. पण आता बसवराज पाटील यांना उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. लिंगायत समाजाच्या मतांच्या जोरावर आपण निवडून येऊ शकतो, असे त्यांनी भाजप नेत्यांना सांगितल्याचे बोलले जाते.

जरांगेंची नार्को टेस्ट करावी, फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी त्यांना १०० जन्म घ्यावे लागतील; राणेंचे टीकास्त्र

काँग्रेसला घरघर :

काही दिवसांपूर्वी मुंबईत माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना राज्यसभा उमेदवारी मिळाली. त्यानंतर बाबा सिद्दकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) काँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला होता. त्यांनाही राज्यसभेची उमेदवारी मिळाली.  या सर्वांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अशातच आता बसवराज पाटील यांनीही काँग्रेसला राम-राम केला आहे.

आगे आगे देखो होता है क्या.. : फडणवीस यांचा दावा

अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर “आगे आगे देखो होता है क्या”, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले होते. भारतीय जनता पक्ष सोबत वेगवेगळ्या पक्षांचे अनेक मोठे नेते येऊ इच्छित आहेत. विशेषतः काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. कारण ज्या प्रकारची वागणूक काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आहे. त्यामुळे या सर्व नेत्यांची तिथे घुसमट होत आहे. विशेषता जे लोकांमधील नेते आहेत. त्यांना वाटत आहे की, देशातील मुख्य प्रवाहासोबत काम करायला हवे.

पत्रकार पोपटलाल! तुमचा पराभव अटळ, तुमच्या गटासाठी नँनो गाडी…; आशिष शेलारांची राऊतांवर टीका

तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून देश हिताला डावललं जात आहे. तसेच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती करत आहे ते पाहून अनेक नेत्यांना वाटत आहे की आपण देखील देशातील मुख्य प्रवाह सोबत काम करायला पाहिजे जनतेसाठी काम केले पाहिजे त्यामुळे अनेक पक्षातील लोक आमच्या संपर्कात आहेत त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे हे आम्ही हळूहळू सांगू, असेही फडणवीस म्हणाल होते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज