रामदेव बाबांना झटका! ‘पतंजली’च्या 14 प्रकारच्या उत्पादनांवर बंदी, भाजपशासित सरकारचा निर्णय

रामदेव बाबांना झटका! ‘पतंजली’च्या 14 प्रकारच्या उत्पादनांवर बंदी, भाजपशासित सरकारचा निर्णय

Patanjali Products Ban in Uttarakhand : भ्रामक जाहिराती देऊन लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी बिनशर्त माफी मागितलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांचे (Ramdev Baba) ग्रह सध्या फिरले आहेत. रामदेव यांच्या पतंजली कंपनीला आणखी (Patanjali) एक झटका बसला आहे. हा झटका भाजपशासित उत्तराखंड सरकारने दिला आहे. उत्तराखंड सरकारच्या औषध नियंत्रण विभागाने पतंजली आयुर्वेदिक फार्मा कंपनीच्या 14 औषधांच्या विक्रीवर बंदी घातल्याची माहिती मिळाली आहे. सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रात ही माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने कंपनीला मोठा झटका बसला आहे. कारण, या औषधांची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती.

रामदेव बाबांना ‘सुप्रीम’ झटका! आता योग शिबीरांसाठीही भरावा लागणार सेवाकर

यामध्ये असे म्हटले आहे की पतंजली आयु्र्वेदिक उत्पादनांच्या भ्रामक जाहिराती प्रकाशित झाल्यामुळे आम्ही कंपनीच्या 14 प्रकारच्या औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांचे उत्पादन बंद करण्याचा आदेश उत्तराखंड सरकारने दिला आहे. इतकेच नाही तर या औषधांचे परवाने देखील सरकारने रद्द केले आहेत. हा आदेश राज्यातील सर्व जिल्हा औषध निरीक्षकांना पाठवण्यात आला आहे. या कारवाईची माहिती केंद्रीय आयुष मंत्रालयालाही देण्यात आली आहे.

रामदेव बाबांच्या योग शिबीरांनाही दणका

बाबा रामदेव यांच्या योग शिबिरांतून होणारी कमाई रडारवर आली आहे. ही शिबीरे सेवा कराच्या कक्षेत आली आहेत. योग शिबीरांचे आयोजन करणाऱ्या पतंजली योगपीठ ट्रस्टला आता सेवा कर भरावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) न्यायनमूर्तींनी यासंदर्भात सेवाकर अपिलीय न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला होता.

याआधी ट्रिब्युनलने आपल्या आदेशात म्हटले होते की योग शिबिरांच शुल्क या शिबीरात सहभागी होणाऱ्या व्यक्तींकडून देणगी म्हणून वसूल केले जात होते. ही रक्कम देणगी म्हणून जमा करण्यात आली असली तरी ती केवळ सेवा देण्यासाठी शु्ल्क म्हणून होती. त्यामुळे ते शु्ल्काच्या व्याख्येत येते.

2024 च्या निवडणुकीबाबत बाबा रामदेव यांचा मोठा दावा, विरोधकांच्या येणार ‘एवढ्या’ जागा?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube