Anand Mahindra on L&T : लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याचे आवाहन दोन दिवसांपूर्वी केले होते. कितीवेळ आपल्या पत्निला पाहत बसणार असंही ते म्हणाले होते. त्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. (Anand Mahindra ) अनेकांनी सोशल मीडियावर या सल्ल्याचा निषेध केला. आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही यावर भाष्य केलं आहे. कामाच्या तासांपेक्षा कामाच्या दर्जाला अधिक महत्त्व दिलं पाहीजे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दिल्ली येथे ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५’ या संमेलनाला संबोधित करत असताना आनंद महिंद्रा यांनी ‘वर्क लाईफ बॅलन्स’ आणि एसएन सुब्रह्मण्यम यांच्या विधानावर भूमिका मांडली. ‘मी हे नेहमी टाळत आलो आहे. माझ्यासाठी किती तास काम केलं, हे महत्त्वाचं नाही. मला कामाच्या दर्जाबाबत विचारा. त्यामुळे किती तास काम केलं, त्यापेक्षा कोणत्या दर्जाचं काम झालं, हे महत्त्वाचं आहे.
बायकोकडे काय बघत बसता? रविवारी काम करण्याचा सल्ला देणाऱ्या L&T कंपनीच्या चेअरमनची सॅलरी 51 कोटी
आनंद महिंद्रा पुढे म्हणाले, मी नारायण मूर्ती आणि इतरांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या विधानाबाबत मला चुकीचे समजू नका. पण मला वाटते, ही चर्चा चुकीच्या दिशेला जात आहे. कामाच्या दर्जावर आपण अधिक चर्चा करायला हवी. त्यामुळे ४० की ४८ किंवा ७० की ९० तास केले, हे महत्त्वाचे नाही. तुम्ही १० तास चांगले काम करू शकत असाल तर त्यातूनही जग बदलता येते.”
मला बायकोला पाहत बसणं आवडतं
मी सोशल मीडियावर सक्रिय असतो, याचा अर्थ मी मोकळा आहे, असं अजिबात नाही. माझी पत्नी छान आहे, तिला पाहत बसायला मला आवडतं. मी सोशल मीडियावर मित्र यादी वाढवायला आलेलो नाही. सोशल मीडिया हे एक उत्तम बिझनेस टुल आहे, म्हणून मी त्याचा वापर करतो. मला असंख्या लोकांकडून सूचना प्राप्त होतात असंही ते म्हणाले आहेत.
‘मेरी पत्नी बहुत ही अच्छी हैं। मैं उनको देखता रहता हूँ. बहस Quality Of Work पर होनी चाहिए, Quantity पर नहीं’
L&T प्रमुख के ‘90 घंटा काम’ ‘बीवी को कब तक देखोगे’ जैसे बयान पर बोले Industrialist @anandmahindra pic.twitter.com/qhf9Kh93qg
— Sanket Upadhyay (@sanket) January 11, 2025