Poultry Farm Business : काय, कमीत कमी भांडवलात एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हणताय? मग तुमच्यासाठी एक सोपा व्यवसाय आहे. यासाठी तुम्हाला जास्त जागेचीही गरज पडणार नाही. पोल्ट्री फार्म नसला तरी तुम्ही कोंबडी पालन (कुक्कुटपालन) व्यवसाय सुरू (Poultry Farm Business) करू शकता. तुमच्याकडे शेती असेल तर शेतीला हा जोडधंदा म्हणून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायासाठी जास्त जमिनीची आणि पैशांचीही गरज नाही. फक्त थोडी मेहनत करावी लागेल आणि तुम्ही चांगली कमाई करू शकता.
आजकाल शेतकरी आणि युवक त्यांच्या घराच्या अंगणात, मोकळ्या जागेत किंवा एखाद्या लहान खोलीत कोंबडी पालन करत (Poultry Farming) आहेत. देशी कोंबड्यांचे पालन जास्त फायदेशीर ठरते. कारण या कोंबड्यांना बाजारात चांगली मागणी आहे आणि पैसेही जास्त मिळतात.
‘झणझणीत मिसळ’, ‘छोले भटुरे’ अन् ‘स्वादिष्ट पराठा’, बेस्ट ब्रेकफास्ट यादीत 3 भारतीय डिश
दहा ते पंधरा कोंबड्यांसाठी फक्त 10 बाय 10 फूट जागा भरपूर होते.
आजार आणि रोगराई थोपविण्यासाठी नियमित साफसफाईची गरज आहे. याकडे खास करून लक्ष दिले पाहिजे.
देशी कोंबड्यांना घरात शिल्लक राहिलेले अन्न, तांदळाचे दाणे, हरभरा देऊ शकता.
जनावरे आणि हवामानापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी त्यांना व्यवस्थित आश्रय निर्माण करणे गरजेचे आहे.
जर तुम्ही हा व्यवसाय 20 देशी कोंबड्यांपासून सुरू करत असाल तर पाच ते सहा महिन्यानंतर प्रत्येक कोंबडी 30 ते 40 अंडे देईल. एका अंड्याची बाजारातील किंमत 10 ते 12 रुपये असते. त्यामुळे तुम्ही फक्त अंड्यांच्या विक्रीतून महिन्याला सहा ते दहा हजार रुपये मिळवू शकता.
जर तुम्ही ब्रॉयलर किंवा लेयर कोंबड्यांचे पालन करत असाल तर उत्पन्न यापेक्षा जास्त मिळेल.
कोंबड्यांच्या आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्वाचे आहे. सध्या अनेक ठिकाणी बर्ड फ्लू आजाराचा उद्रेक होताना दिसत आहे. त्यामुळे कोंबड्यांचे लसीकरण (Vaccination) आणि वेळोवेळी त्यांना औषधोपचार करत राहा. कोणत्याही परिस्थितीत या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.
पाऊस आणि थंडीच्या दिवसात कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी पक्की झोपडी, खुराडा किंवा अन्य आश्रय व्यवस्था तयार करून घ्या.
कोंबड्यांना मोकळ्या जागेत फिरण्याची व्यवस्था करा. ही गोष्ट सुद्धा जास्त महत्त्वाची आहे. कारण यामुळे कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
अंडे आणि कोंबड्या थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने तुम्हाला जास्त फायदा होईल. ग्राहकांशी संपर्क वाढेल. मध्यस्थांचा त्रास राहणार नाही. पैसेही चांगले मिळतील. या प्रकारे थोडा वेगळा विचार करून पाहा.
कोरोना पुन्हा येतोय… ‘ही’ औषधे आताच ठेवा घरात, मोठा खर्च टळेल