अनमोल बिश्नोई करणार मोठे खुलासे? 11 दिवसांची NIA कोठडी

Anmol Bishnoi : एनआयएकडून अटक करण्यात आलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने

Anmol Bishnoi Photo

Anmol Bishnoi Photo

Anmol Bishnoi : एनआयएकडून अटक करण्यात आलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने 11 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. अनमोल बिश्नोईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाब सिद्दीकी यांच्या हत्येचा आरोप आहे. तसेच त्याच्यावर देशातील अनेक राज्यात 31 पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पटियाला हाऊस न्यायालयाने (Patiala House Court) 11 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवल्याने अनमोल बिश्नोई बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनेक मोठे खुलासे करु शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्ली विमानतळावरुन अटक केल्यानंतर एनआयएने अनमोल बिश्नोईला (Anmol Bishnoi) दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयातील संध्याकाळी 5 वाजता विशेष न्यायाधीश प्रशांत कुमार शर्मा यांच्यासमोर हजर केले.

यावेळी एनआयएने अनमोल बिश्नोईसाठी 15 दिवसांची कोठडी मागितली होती. बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) खून प्रकरण, एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या यासह अनेक मोठ्या गुन्ह्यांमध्ये अनमोल बिश्नोईचा नाव समोर आला आहे. त्याला आज अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले.

तो नोव्हेंबर 2024 पासून अमेरिकेच्या ताब्यात होता. 2022 पासून फरार असलेला अनमोल अमेरिकेतून त्याचा तुरुंगात असलेला भाऊ लॉरेन्स बिश्नोई याचे दहशतवादी सिंडिकेट चालवत होता. त्याच्या प्रत्यार्पणानंतर, तो या टोळीशी संबंधित प्रकरणात अटक झालेला 19 वा आरोपी बनला.

Under 19 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानशी सामना नाहीच; भारत ‘या’ दिवशी सुरु करणार मोहीम

एनआयएने निवेदनात म्हटले आहे की मार्च 2023 मध्ये अनमोल बिश्नोईविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तपासात असे दिसून आले की 2020 ते 2023 दरम्यान, अनमोलने नियुक्त दहशतवादी गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी संगनमत करून देशात अनेक दहशतवादी कारवाया करण्यात सक्रिय भूमिका बजावली होती.

Exit mobile version