Download App

कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक

दावणगेरे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी आल्याची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान मोदींच्या कर्नाटक (Karnataka) दौऱ्यादरम्यान शनिवारी (२५ मार्च) ही चूक झाली. पंतप्रधान मोदींची गाडी दावणगेरेतून (Davangere) जात असताना एक तरुण त्यांच्या गाडीजवळ पोहोचला. पंतप्रधानांच्या रोड शो दरम्यान तरुण ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी या तरुणाला तात्काळ पकडले. तरुणाची चौकशी केली जात आहे. तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या आहेत. जानेवारीत, कर्नाटकातील हुबळी येथे पीएम मोदींच्या रोड शो दरम्यान एक मुलगा त्यांच्या जवळ आला होता.

मे महिन्यात कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने शनिवारी (२५ मार्च) दावणगेरे येथे ‘विजय संकल्प यात्रा’ सुरू केली आहे. भाजपच्या प्रचाराचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी कर्नाटकात पोहोचले आणि दावणगेरे येथे एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले, मात्र त्याआधी त्यांनी रोड शो केला. या रोड शो दरम्यान एका तरुणाने अचानक सुरक्षा कठडा तोडला आणि तो पीएम मोदींच्या गाडीकडे जाऊ लागला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.

Balasaheb Thorat : तुमच्या नेत्यांच्या फोटोला जोड्यांनी मारले तर चालेल का?

पोलिसांच्या हवाल्याने या व्हिडिओला दुजोरा देण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दावणगेरेमध्ये रोड शो दरम्यान, जेव्हा पीएम मोदींचा ताफा रस्त्यावरून जात आहे, तेव्हा मोठ्याने ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या जात आहेत.

लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून घोषणा देत आहेत, त्याच दरम्यान चेक शर्ट आणि निळी जीन्स घातलेला एक तरुण वेगाने पावले टाकतो आणि ज्या रस्त्यावरून काफिला जात होता त्या रस्त्याकडे धावतो. तो पीएम मोदींच्या गाडीसमोर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी हात उंचावून जनतेला अभिवादन करत आहेत. पोलीस त्या माणसाला पकडतात आणि पंतप्रधानांचा ताफा पुढे सरकतो.

Tags

follow us