कोटा येथे आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या, लातूरच्या तरुणाने कोचिंग सेंटरच्या इमारतीवरुन उडी

Kota Coaching Centre : गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील कोटा येथे कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच सत्र सुरुच आहे. रविवारी आणखी एका विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. हा विद्यार्थ्यी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आहे. आविष्कार संभाजी कासले असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. परीक्षा देऊन आला आणि उडी मारली डेप्युटी एसपी धरमवीर सिंह म्हणाले, ही घटना रविवारी […]

Kota Coaching Centre

Kota Coaching Centre

Kota Coaching Centre : गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील कोटा येथे कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच सत्र सुरुच आहे. रविवारी आणखी एका विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. हा विद्यार्थ्यी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आहे. आविष्कार संभाजी कासले असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

परीक्षा देऊन आला आणि उडी मारली
डेप्युटी एसपी धरमवीर सिंह म्हणाले, ही घटना रविवारी दुपारी 3.09 वाजता घडली. लातूर येथील आविष्कार संभाजी कासले (16) यांनी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कोटा येथील तलवंडी भागात हा विद्यार्थी 3 वर्षांपासून राहत होता. तो येथे NEET ची तयारी करत होता. त्याची आजीही त्याच्यासोबत दीड वर्षांपासून राहत होती. कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये परीक्षेला बसण्यासाठी आला होता.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात पुण्याचा डंका! मृणाल गांजाळे यांनी कोरले नाव…

डेप्युटी एसपी धरमवीर यांच्या म्हणण्यानुसार, कोचिंगच्या विद्यार्थ्याने वर्गात बसून परीक्षा दिली. परीक्षा संपताच तो बाहेर आला आणि बाल्कनीतून खाली उडी मारली. तो सहाव्या मजल्यावरून सुमारे 70 फूट खाली पडला. त्यांच्या डोक्याला व शरीरावर गंभीर जखमा झाल्या. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली.

विज्ञाननगर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मृतदेह एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. सध्या आत्महत्येच्या कारणांचा शोध सुरू आहे.

Exit mobile version