राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात पुण्याचा डंका! मृणाल गांजाळे यांनी कोरले नाव…

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात पुण्याचा डंका! मृणाल गांजाळे यांनी कोरले नाव…

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातील मृणाल गांजाळे यांच्यासह देशातील 50 शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मृणाल गांजाळे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे इथल्या जिल्हा परिषदेत शाळेतल्या शिक्षिका आहेत.

‘पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं केलं पण..,’;ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच संतोष बांगरांना घेरलं

मृणाल गांजाळे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्रालायकडून त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार पटकावणाऱ्या गांजाळे महाराष्ट्रातून एकमेव शिक्षिका ठरल्या आहेत.

गलांडेची दहशत मोडून काढू! विखे पाटलांचा शब्द; अमानुष मारहाण प्रकरणात 6 जणांवर गुन्हा दाखल

यंदाच्या वर्षी देशभरातल्या एकूण 50 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून ज्या शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे, अशा शिक्षकांना येत्या राष्ट्रीय शिक्षक दिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार शिक्षकांना देण्यात येणार आहे.

पवार-आंबेडकर यांच्यातील राजकीय अढी सुटणार का? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले

50 हजार रुपये, प्रमाणपत्रासह रोप्यपदक असं या पुरस्काराचं स्परुप असून २०२३-२४ मधील शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या ‘फेलोशिप’च्या गांजाळे या मानकरी ठरल्या आहेत. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे.

दरम्यान, महाळुंगे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय निवड समितीने गांजाळे यांची सर्वाधिक गुणांनी निवड करत राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्याबद्दल राज्यस्तरीय निवड समिती आणि गांजाळे यांचे अभिनंदन करत आहे.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube