गलांडेची दहशत मोडून काढू! विखे पाटलांचा शब्द; अमानुष मारहाण प्रकरणात 6 जणांवर गुन्हा दाखल

गलांडेची दहशत मोडून काढू! विखे पाटलांचा शब्द; अमानुष मारहाण प्रकरणात 6 जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर : शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशयावरून जिल्ह्यातील चार मागासवर्गीयांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. यातील एका तरुणाला झाडाला बांधून त्याच्यावर अमानुष कृत्य केल्याचं समोर आलं होतं. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. (case has been registered against six people in the case of inhuman beating and an inquiry has also been ordered.)

दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांनी शनिवारी हरेगाव बंद ठेवून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जखमींची भेट घेत कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता या घटनेची दखल घेण्यात आली असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. नाना गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे, अशी गुन्हा दाखल झालेल्या 6 जणांची नाव आहेत.

उरलेले 5 ते 6 आमदारही लवकरच येतील, छगन भुजबळांचा मोठा दावा

अधिक माहितीनुसार, या दलित तरुणांवर बकऱ्या आणि कबुतरे चोरल्याचा संशय होता. त्यानंतर सहाही आरोपींनी या तरुणांना घरातून उचलून नेत गलांडे यांच्या शेतातील विहिरीवर नेले. तिथे कपडे काढून त्यांना अर्धनग्न केले. काही जणांनी दोरीने त्यांचे पाय बांधले, तर इतरांनी झाडाला उलटं लटकवत अत्यंत क्रुरपणे मारहाण केली, असे पीडित तरुणांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. या मारहाणीत शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड, खंडागळे हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांना शिरापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Ahmednagar News : नगरच्या ढोल ताशांचा आवाज घुमणार साता समुद्रापार

या घटनेचा व्हिडीओ शुक्रवारी रात्री उशीरा गावात व्हायरल झाला, त्यानंतर घटना वाऱ्यासारखी पसरली. व्हिडीओ पाहूनच काही तरुणांनी तातडीने शेतात धाव घेऊन या चारही मुलांची सुटका केली. दरम्यान, ग्रामस्थांच्या आक्रमकतेनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घटनेतील गलांडेची दहशत मोडून काढू असे आश्वासन दिले असून  आरोपींना दोन दिवसांत अटक केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube