उरलेले 5 ते 6 आमदारही लवकरच येतील, छगन भुजबळांचा मोठा दावा

उरलेले 5 ते 6 आमदारही लवकरच येतील, छगन भुजबळांचा मोठा दावा

Chhagan Bhujbal on Sharad Pawar : शरद पवार (Sharad Pawar) गटासोबत असलेले पाच-सहा आमदार लवकरच आमच्याबरोबर येतील, असा दावा अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. भुजबळांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भुजबळ म्हणाले की शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाला तेव्हा त्या प्रस्तावावर राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या सह्या होत्या. म्हणजेच सगळे आमदार अजित पवारांसोबतच आहेत. सध्या जे पाच-सहा आमदार शरद पवार साहेबांसोबत आहेत, ते देखील लवकरच आमच्याबरोबर येतील, असे त्यांनी म्हटले आहे.

‘भारतात बसून चांद्रयान चंद्रावर उतरु शकतं, मग ईव्हीएम मार्फत मतदान…’; आव्हाडांना शंका

बीड येथील सभेला जाण्यापूर्वी भुजबळ यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाजी भिडे, ब्राम्हण समाजाबद्दल केलेले विधान, राष्ट्रवादीतील बंड अशा सर्वच विषयांवर भाष्य केलं.

ते पुढे म्हणाले की राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेली नाही, पक्षातील बहुतांश प्रतिनिधी कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या बरोबर आहेत. अजितदादांसोबत 45 ते 50 आमदार आहेत. आता राहिलेले आमदारही दादांसोबत येतील, असेही ते म्हणाले.

बारामतीत अजित पवारांची फटकेबाजी; पण शरद पवार, सुप्रिया सुळेंवर शब्दही नाही

सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वीच्या प्रस्तावावर 54 आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याचा अर्थ सर्वजण अजित पवार यांच्यासोबत आहेत. पवार साहेबांसोबत असलेले 5 ते 6 आमदारही लवकरच परत येतील. पवार साहेब सकाळी एक आणि संध्याकाळी एक असी वेगळी विधान करतात, असे भुजबळ यांनी म्हटले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube