बारामतीत अजित पवारांची फटकेबाजी; पण शरद पवार, सुप्रिया सुळेंवर शब्दही नाही
पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रथमच बारामतीमध्ये जाहीर सभा झाली. अजित पवारांची बारामतीमध्ये (Baramati)जंगी रॅली काढण्यात आली होती. अजित पवारांचे बारामतीकरांचे जोरदार स्वागत केले. अजित पवार हे भाषणात बारामतीच्या, जिल्ह्याच्या विकासाबाबत भरभरून बोलेले आहे. परंतु त्यांनी आपल्या भाषणात कुणावरच टीका केली नाही. आपले काका शरद पवार, बहिण सुप्रिया सुळे यांच्याबाबत प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे एकही शब्दही बोलले नाहीत. त्याचीही चर्चा आता होऊ लागली आहे.
‘बायकोने कधी किस घेतले नाहीत एवढे किस घेतले’, अजितदादांनी सुनेत्रा पवारांसमोरच सांगितला किस्सा
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार हे अजित पवारांबरोबर गेलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत. बीडनंतर कोल्हापुरमध्ये झालेल्या सभेत शरद पवारांनी हसन मुश्रीफांवर जोरदार हल्लाबोल केला होता. परंतु त्यांनी अजित पवारांवर थेट टीका केली नाही. सुप्रिया सुळेंनीही अजित पवारांवर अजूनही थेट टीका केलेली नाही. तर अजित पवारही बारामतीमध्ये झालेल्या सभेमध्ये शरद पवार व सुप्रिया सुळेंवर काहीच बोलेले नाहीत. अजित पवारांबरोबर गेलेले एक-दोन नेते सोडले तर बाकीचे नेतेही शरद पवारांबाबत बोलत नाहीत. शरद पवारांबरोबर असलेले जितेंद्र आव्हाड हे आक्रमक आहेत. तेही अजित पवारांना टाळून इतर नेत्यांवर मात्र ते सडकून टीका करतात.
मी जो काही आहे तो बारामतीकरांमुळे आहे. इथून पुढे अनेक ठिकाणी सभा घ्याव्या लागतील. मी जी भूमिका घेतलीय ती का घेतलीय हे महाराष्ट्राला सांगावे लागेल. मी शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे चाललोय. मी जोपर्यंत मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत समाजातील कुठल्याही घटकाला असुरक्षित वाटणार नाही याची ग्वाही देतो. मी सत्तेला हपापलेले कार्यकर्ता नाही. मी लोकांची कामे करतो, असे अजित पवारांनी भाषणात सांगितले. तसेच पुणे-नाशिक रेल्वे रेंगाळली आहे. त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करत असलेल्या विकासावर बोलले. साखर कारखान्यांना माफ झालेल्या कराबाबतही अजित पवार बोलले.
मुख्यमंत्रिपदाची सल मात्र कायम
अजित पवार यांचे भाषण सुरू असताना एकाने दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हा, असे म्हटले आहे. तो धाग पकडत अजित पवारांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्रिपदाची सलही बोलून दाखविली आहे. 2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाची संधी होती. सोनिया गांधींनी विलासराव देशमुख यांना म्हटलेली होते की राष्ट्रवादीच्या जागा जास्त आहेत. पण ते होऊ शकले नाही. 2019ला शिवसेनेपेक्षा आपल्या दोनच जागा कमी होत्या. पण अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यात आले नाही. मी याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, ही सल मात्र अजित पवारांनी बोलून दाखविली.