राजकारणातील कटुता आता स्नेहामध्येही; प्रथमच प्रतिभाताई पवार एकट्याच भीमाशंकरला ! वळसेंच्या कुटुंबाची पाठ

राजकारणातील कटुता आता स्नेहामध्येही; प्रथमच प्रतिभाताई पवार एकट्याच भीमाशंकरला ! वळसेंच्या कुटुंबाची पाठ

पुणेः अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटात गेले आहे. त्यातून शरद पवार व मंत्री दिलीप वळसे पाटील हे एकमेंकांना आव्हान देत आहेत. राजकारणाबरोबर त्यांच्या कुटुंबाचे स्नेहाचे नाते आहे. परंतु आता राजकारणामुळे नात्यांमध्ये कटुता आल्याचे उदाहरण समोर आले आहे. दिलीप वळसे यांच्या मतदारसंघात असलेल्या भीमाशंकरला (Bhimashankar) प्रतिभाताई आल्यानंतर त्यांचे स्वागत दिलीप वळसे यांच्या पत्नी किरण वळसे या करत असतात. परंतु यंदाच्या श्रावण महिन्यातील पुजेला मात्र तसे स्वागत झाले नाही. त्यामुळे प्रथम प्रतिभाताई पवार एकट्याच भीमाशंकरला गेल्या होत्या. त्यामुळे राजकारणातील कटुता आता कुटुंबात आली आहे.

Ajit Pawar यांच्याकडून मोरगावच्या श्री मयुरेश्वराचे सपत्निक दर्शन, पाहा फोटो

भीमा शंकरच्या एकत्रित पुजेलाही एक महत्त्व आहे. 1978 शरद पवार हे राज्याचे उद्योगमंत्री होते. तेव्हा दिलीप वळसे पाटील यांचे वडिल दत्तात्रय वळसे यांच्याबरोबर शरद पवार हे भीमाशंकरला गेले होते. त्यावेळी ते विश्रामगृहात मुक्कामी होते. त्यावेळी शरद पवार यांच्या अंगावरून साप गेला होता. तेव्हा दत्तात्रय वळसे यांनी हा शुभशकुन असल्याचे सांगितले. त्यानंतर शरद पवारांच्या हस्ते शिवलिंगाची पूजा करण्यात आली होती. त्यानंतर आठ दिवसात शरद पवार हे मुख्यमंत्री झाले होते. एका भाषणात शरद पवारांनी हा किस्सा सांगितला आहे.

Ahmednagar News : नगरच्या ढोल ताशांचा आवाज घुमणार साता समुद्रापार

तेव्हापासून प्रतिभाताई पाटील या गोविंदराव आदिक यांच्या पत्नी पुष्पलता, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला या श्रावण महिन्यात भीमाशंकरला येऊन शिवलिंगाची पूजा करतात. त्यांचे स्वागत दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण या करत. एकत्यार जेवण करत असत. सर्वांचे एक अतूट नाते निर्माण झाले होते. गेल्या 44 वर्षांपासून हे सुरू होते. आज खासदार सुप्रिया सुळे या आईला घेऊन भीमाशंकरला गेल्या होत्या. तेथे त्यांनी पूजा केली. परंतु प्रथमच वळसे पाटलांच्या कुटुंबातील कुणीही उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीचे काही स्थानिक कार्यकर्ते तेथे उपस्थित होते.

सुप्रिया सुळेंची त्या खोलीला भेट, वळसेंच्या वडिलांची आली आठवण

१९७८ ला शरद पवार हे ज्या गेस्ट हाऊसमधील खोलीत उतरले होते, त्या खोलीस सुप्रिया यांनी भेट दिली. याच खोलीत त्यांच्या अंगावरुन साप गेला होता. यानंतर माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांनी आईला दरवर्षी भीमाशंकरला येऊन दर्शन घेण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर १९७९ पासून आई दरवर्षी श्रावण महिन्यात येथे येऊन श्री महादेवाचे दर्शन घेत असते. गेली अनेक वर्षांपासून हा शिरस्ता कायम आहे. आजही आम्ही श्री क्षेत्र भीमाशंकर येथे येऊन दर्शन घेतले. यावेळी दत्तात्रय (दादा) वळसे पाटील यांची आवर्जून आठवण आली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube