‘बायकोने कधी किस घेतले नाहीत एवढे किस घेतले’, अजितदादांनी सुनेत्रा पवारांसमोरच सांगितला किस्सा

‘बायकोने कधी किस घेतले नाहीत एवढे किस घेतले’, अजितदादांनी सुनेत्रा पवारांसमोरच सांगितला किस्सा

Ajit Pawar Baramati Sabha : उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती (Ajit Pawar) येथे आले होते. यावेळी त्यांचे बारामतीकरांनी (Baramati Sabha) जोरदार स्वागत केले. या स्वागताचे कौैतुक करताना अजित पवार म्हणाले की एवढी ढकलाढकली, रेटारेटी कधी आयुष्यात मला कोणी केली नव्हती. हातात हात देत होतो तर एवढे हात ओढत होते की दोन्ही हात तुटतील असे वाटत होते. काही काही पठ्ठे हाताचे मुके घेत होते, किस घ्यायचे. मनात विचार आला की बायकोने एवढे कधी किस घेतले नाहीत, एवढे किस चालले होते. पण ठरवलं होतं की आज चिडायचं नाही. गप बसायचं. सगळ्यांना हात जोडायचे, असे अजित पवार यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले की सर्व लोक प्रेमाने आले होते, कोणाला बळजबरी केली नव्हती. काय तो फुलांचा सडा, असा पाकळ्यांचा सडा कधी बारामतीच्या रस्त्यांनी बघितला नसेल. आज बारामतीत एन्ट्री केल्यानंतर अशी गर्दी होती की अरं अरं.. असलं कधी बघितलं नाही. एवढे क्लासमेंट भेटले, इतके जण भेटले की मी पाहातच राहिलो. अनेक माता भगिनी ओवाळत होत्या, प्रोत्साहन देते होत्या, सगळी बारामती बाहेर आली होती, असली मिरवणूक मी आजपर्यंत पाहिली नव्हती, असे अजित पवार यांनी बारामतीच्या सभेत म्हटले.

‘मी मोदींवर टीका केली, पण मला माहित नव्हतं..’.; अजित पवारांकडून पंतप्रधान मोदीचं तोंडभरून कौतुक

जिल्हा बॅक, मार्केट कमिटी, दूध संघ यांच्या माध्यामातून काही कार्यकर्त्यांना प्रतिनिधीत्व मिळाले आहे पण जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळत नव्हते म्हणून सुप्रीम कोर्टात केस सुरु आहे. त्यामुळे तिथला निकाल जेव्हा लागेल तेव्हा निवडणुका जाहीर होतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या सभेतून सांगितले.

राजकारणातील कटुता आता स्नेहामध्येही; प्रथमच प्रतिभाताई पवार एकट्याच भीमाशंकरला ! वळसेंच्या कुटुंबाची पाठ

ते पुढं म्हणाले की तुम्ही आता मला विचाराल की पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झालात पुढं कोणती काम करणार आहात? तर पुणे-नगर-नाशिक ही रेल्वे रेंगाळली आहे. त्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करणार आहे, वेळ पडली तर दिल्लीला जाईल. तिथल्या प्रमुखांची भेट घेईन, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील तसंच त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करणार आहे. कारण दळणवळण महत्वाचे आहे. पुणे जिल्ह्यासाठी चांगले विमानतळ, मेट्रो, चांगले रस्ते अशा सुविधा दिल्याशिवाय कायापालट होऊ शकत नाही, असे अजित पवार यांनी बारामती येथे सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube