‘मी मोदींवर टीका केली, पण मला माहित नव्हतं..’.; अजित पवारांकडून पंतप्रधान मोदीचं तोंडभरून कौतुक

‘मी मोदींवर टीका केली, पण मला माहित नव्हतं..’.; अजित पवारांकडून पंतप्रधान मोदीचं तोंडभरून कौतुक

Ajit Pawar Baramati speech : भारत आता जगातील चौथी अंतराळ शक्ती ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला पहिल्या पाचमध्ये आणण्याचे काम केले. आता त्यांना आपली अर्थव्यवस्था पहिल्या तीनमध्ये आणायची आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने स्वतंत्र विकास मुद्रा उमटवली. मागे काही सभांमध्ये मोदीजींच्या विरोधात मीच प्रचार केला. त्याच्या विरोधात सभा घेतल्या. कारण मला माहित नव्हतं, मोदी समोर कसं काम करणार?  मात्र, आज त्यांचं नेतृत्व जगाने मान्य केलं, अशा शब्दात पंतप्रधान मोदीचं तोंडभरून कौतुक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड करून अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर आज तब्बल दोन महिन्यानंतर ते बारामतीत आले. बारातमीत अजित पवारांची नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सभेला संबोधित करतांना अजित पवारांनी पंतप्रधान मोदीचं कौतुक केलं. ते म्हणाले, आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आजपर्यंत जेवढे पंतप्रधान झाले, त्यांनी आपल्या कारकिर्दीत चांगलं काम केलं. देशाला नवं नेतृत्व दिलं. जगात देश पहिल्या क्रमाकांवर कसा राहिल, यासाठी अतोनात प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या अर्थव्यस्थेला बळकटी देऊन पहिल्या पाचमध्ये आणण्याचं काम केलं. आता त्यांना आपली अर्थव्यवस्था पहिल्या तीनमध्ये आणायची आहे.

राजकारणातील कटुता आता स्नेहामध्येही; प्रथमच प्रतिभाताई पवार एकट्याच भीमाशंकरला ! वळसेंच्या कुटुंबाची पाठ 

अजित पवार म्हणाले, आज आपला देश जगात केवळ संस्कृती आणि परंपरासाठी ओळखला जात नाही. तर देश अनेक आघाड्यांवर विविध क्षेत्रात कामगिरी करत आहे. विकासाच्या बाबतीत आपण जपानलाही मागे टाकू. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशानं स्वतंत्र विकास मुद्रा उमटवली. मागे काही सभांमध्ये मीच मोदीजींच्या विरोधात प्रचार केला. त्यांच्या विरोधात सभा घेतल्या. हे मी मान्य करतो. कारण मला माहिती नव्हतं, समोर कसं काम होणार आहे. मात्र, आज त्याचं नेतृत्व जगाने मान्य केल्याचं ते म्हणाले.

आपण पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली. सरकारमध्ये मी सहभागी झाल्यावर मंत्रिमंडळात मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, महिला, भटके, ओबिसी सर्वांना सामावून घेतलं. शाहु-फुले-शाहू आंबेडकरांचा विचारांना राज्याचं नेतृत्व करतो, हे भाषणातून नाही, हे कृतीतून दिसायलं हवं. सरकारमध्ये काम करतांना एकाही घटकाला असुरक्षित वाटू देणार नाही, असं ते म्हणाले.

आज बारातमी-फटलन रोडसाठी ७०० कोटी रुपयांचं काम मंजूर झालं. भिगवण-बाारमती कॉंक्रीट रस्त्याचं काम सुरू आहे. पुणेृनगर – नाशिक रेल्वेच्या कामाला गती देणार आहे. दळणवळण, विमानतळाची सोय, रस्ते आदी काम करणार आहे. सुदैवाने तिजोरीचा चावी आपल्याकडे आली आहे, मी सत्तेसाठी हपालेलो नाही, सत्ता येते जाते. कोणीही ताम्रटप घेऊन जन्माला आलं नाही. पण मिळालेल्या संधीचं सोन करायचं असतं. असं ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube