Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाने मोठे यश मिळवले आहे. सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी उझैर खानचा खात्मा केला आहे. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, अनंतनागमध्ये दहशतवादी उझैर मारला गेला आहे. मृतदेहाचा शोध सुरू असून तो दहशतवाद्याचा असू शकतो. त्यामुळे शोध मोहीम सुरूच राहणार आहे. या कारवाईत चार जवानही शहीद झाले आहेत.
सध्या अनंतनागमध्ये सुरू असलेली चकमक संपली आहे. अशा परिस्थितीत आता सुरक्षा दलांनी शोध मोहिमेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. याचे कारण येथे दहशतवाद्यांशी संबंधित गोष्टी असू शकतात. या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असून चार जवान शहीद झाले आहेत. तिसऱ्या दहशतवाद्याच्या मृतदेहाचाही लष्कर शोध घेत आहे. सध्या लष्कराने या संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. लष्कराचे जवान जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.
काही भागात शोधमोहीम सुरू राहणार
एडीजीपी विजय कुमार यांनी मंगळवारी अनंतनाग ऑपरेशनबाबत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘शोध मोहीम सुरूच राहणार आहे कारण अनेक भाग बाकी आहेत. आम्ही लोकांना त्या भागात न जाण्याचे आवाहन करतो. आम्हाला दोन ते तीन दहशतवाद्यांची माहिती होती. ते पुढे म्हणाले, ‘आम्हाला तिसरा मृतदेहही कुठेतरी सापडण्याची शक्यता आहे. या कारणास्तव आम्ही शोध मोहीम सुरू ठेवणार आहोत.
#WATCH | Anantnag: "The search operation will continue as many areas areas are still left…We would appeal to the public to not go there…We had the information about 2-3 terrorists. It's possible that we find the third body somewhere that's why we will complete the search… pic.twitter.com/XvexX56UAh
— ANI (@ANI) September 19, 2023
विजय कुमार म्हणाले, ‘आम्हाला लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरचा मृतदेह सापडला असून त्याला आमच्या ताब्यात घेतले आहे. आम्हाला आणखी मृतदेह सापडू शकतात, त्यामुळे तिसऱ्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. आठवडाभरापासून सुरू असलेली ही चकमक आता संपुष्टात आली आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग कोकरनम भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली, त्यानंतर लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस येथे पोहोचले.