Download App

जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार; स्वातंत्र्य दिनापूर्वीच भारतमातेने वीर पुत्र गमावला

डोडा जिल्ह्यातील अस्सार भागात ही चकमक झाली असून, भारतीय सैन्याने परिसरातून एक एम 4 रायफल, कपडे आणि तीन रकसॅक बॅग जप्त केल्या आहेत.

  • Written By: Last Updated:

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत भारतीय सैन्यातील कॅप्टन शहीद झाले आहे. तर, चार दहशतवाद्यांना ठार झाल्याचेही शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.  शहीद झालेले कॅप्टन 48 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. सध्या घटनास्थळी दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. असून, लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. डोडा जिल्ह्यातील अस्सार भागात ही चकमक झाली असून, भारतीय सैन्याने परिसरातून एक एम 4 रायफल, कपडे आणि तीन बॅगा जप्त केल्या आहेत.

सुरक्षा दलांना जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यातील पटनीटॉप आणि डोडा जिल्ह्यातील असर या सीमेवरील जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर मंघळवारी संध्याकाळपासून या ठिकाणी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. यादरम्यान दहशवादी आणि सैन्यदलात चकमक झाली. त्यात भारतीय लष्कराच्या 48 राष्ट्रीय रायफल्सचा एक कॅप्टन शहीद झाला आहे. तर, चार दहशवादी मारले गेल्याची शक्यता सैन्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या कारवाईदरम्यान एक नागरिकही जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जवानांनी दहशतवाद्यांच्या ताब्यातून एक एम-4 रायफल आणि 3 बॅग जप्त केल्या आहेत. भारतीय लष्कराने या ऑपरेशनला ऑपरेशन असार असे नाव दिले आहे.

अनंतनाग चकमकीत दोन जवान शहीद 

यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते आणि एक नागरिक ठार झाला होता. अनंतनाग येथे कर्तव्यावर असताना हवालदार दीपक कुमार यादव आणि लान्स नाईक प्रवीण शर्मा यांना वीरमरण आले. जुलैमध्ये, गृह मंत्रालयाने (MHA) लोकसभेला सांगितले होते की, यावर्षी 21 जुलैपर्यंत दहशतवादाशी संबंधित 11 घटना आणि 24 दहशतवादविरोधी कारवायांमध्ये नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 28 लोक मारले गेले.

follow us