मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

Mamata Banerjee : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आजपासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर

Mamata Banerjee

Mamata Banerjee

Mamata Banerjee : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आजपासून दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)  यांच्यासह दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ताब्यात घेतले आहे.

‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रिया थांबवणे आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांनी राजीनामा द्यावा, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर, कनॉट प्लेस आणि जनपथ रोडसह अनेक भागांत कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. BSF आणि पोलीस दलातील सुमारे 38, 000 सुरक्षा कर्मचाऱ्यांना कडक सूचनांसह तैनात करण्यात आले आहे. आज नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या 75 मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, 45 मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली असून 10 स्थानबद्धता केंद्रे (detention centers) उभारण्यात आली आहेत. इंडिया गेटच्या 4 किलोमीटर परिसरातील इंटरनेट सेवा काल रात्री 10 वाजता बंद करण्यात आली होती आणि ती आज (शनिवारी) रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहील.

CJP Protest पोलिसांवर दगडफेक, 2 अधिकारी जखमी तर 500 जण ताब्यात-

Exit mobile version