CJP Protest पोलिसांवर दगडफेक, 2 अधिकारी जखमी तर 500 जण ताब्यात
CJP Protest : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आजपासून दिल्लीतील जंतरमंतर मैदानात
CJP Protest : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आजपासून दिल्लीतील जंतरमंतर मैदानात कॉक्रोज जनता पार्टीने आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनाच्या पाहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत मोठा गदारोळ झाला आहे. आकाशवाणी भवनाजवळ असलेल्या इम्तियाज अली मार्गावर आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले आणि पोलिसांवर दगडफेक केली असून त्यात दोन अधिकारी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास 25 ते 30 आंदोलकांच्या एका गटाने इम्तियाज अली मार्गावरील बॅरिकेड्स ओलांडले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी (Delhi Police) त्वरित कारवाई करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
जंतर मंतर :
प्रोटेस्टर्स ने पहली बैरिकेडिंग पार कर ली है।
लगता है रात भर अभिमन्यु ट्रेनिंग चली है। https://t.co/OpIhOMogDU— Samar Raj (@SamarRaj_) October 10, 2026
परवानगी नसतानाही आंदोलन
सीजीपीच्या (CJP) या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली नसून नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था व प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही, आंदोलकांनी जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि निमलष्करी दलांनी कनॉट प्लेससह विविध ठिकाणांहून 500 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. अनेक आंदोलकांनी सुरक्षेचे कडे तोडून वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठपुरावा करून त्यांना ताब्यात घेतले आणि बसेसमधून नेले. ताब्यात घेतलेल्यांपैकी अनेकजण “इन्कलाब जिंदाबाद”च्या घोषणा देताना दिसले.
Neha Bora Detained, other Protesters have surrounded the bus to Block https://t.co/icXiM6e6sk
— Hemant Rajaura (@hemantrajora_) October 10, 2026
नेत्यांना आधीच ताब्यात घेतले
परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने नवी दिल्ली जिल्ह्याचे 20 विभागांत (सेक्टर्समध्ये) विभाजन केले होते आणि वरिष्ठ अधिकारी सतत देखरेख करत होते. त्याआधी, CJP नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रंका यांना राजधानीत दाखल होताच दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते.