सहा वर्षांपूर्वी युती तोडली, आता पुन्हा एकत्र; पंजाब निवडणुकीआधी भाजप-अकाली दलाची युती, अमित शहांची मोठी घोषणा!

BJP Akali Dal Alliance Punjab: पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकदा एकत्र आले.

BJP Akali Dal Alliance Punjab: पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकदा एकत्र आले.

BJP Akali Dal Alliance Punjab: पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिरोमणी अकाली दल (SAD) पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. तब्बल 6 वर्षांनंतर दोन्ही पक्षांनी आपली जुनी युती पुन्हा जाहीर केली आहे. गुरु नानक देव (Guru Nanak Dev) यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील भाजप मुख्यालयात या युतीची घोषणा करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन (Nitin Nabin) आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली.

प्रियांश आर्यचा मैदानात धुमाकूळ! 181 धावा ठोकत ख्रिस गेलचा 13 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

2020 मध्ये केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांवरून अकाली दलाने भाजपसोबतची 24 वर्षांची युती तोडली होती. आता 2027 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी पुन्हा हातमिळवणी केली आहे. अकाली दलाचे एनडीएमध्ये पुनरागमन झाल्याचं सांगत अमित शहा यांनी सुखबीर सिंह बादल यांचं स्वागत केलं.

‘पंजाबला अमली पदार्थमुक्त करणार’, अमित शहांचं आश्वासन

युतीची घोषणा करताना अमित शहा यांनी ही युती हिंदू-शीख ऐक्याचं प्रतीक असल्याचं सांगितलं. पंजाबमधील अमली पदार्थांची समस्या संपवणं, भ्रष्टाचाराला आळा घालणं आणि राज्यात कायदा-सुव्यवस्था मजबूत करणं ही युतीची प्रमुख उद्दिष्टं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पैगंबर शेख यांना मुंबई पोलिसांची नोटीस! भाजप नेत्यांविरोधात हिंसक कृत्यांना चिथावणीचा आरोप

अमित शहा म्हणाले, “पंजाबला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करणं हे एनडीएचं प्रमुख ध्येय आहे. आम्ही पंजाबच्या जनतेला आश्वासन देतो की, 31 डिसेंबर 2029 पर्यंत राज्याला अमली पदार्थमुक्त करू.” तसेच राज्यातील शेतकरी आणि तरुणांच्या हितासाठीही काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

अकाली दल मोठा भाऊ, मुख्यमंत्रीही त्यांचाच!

या युतीतील जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबतही अमित शहा यांनी महत्त्वाचं विधान केलं. पंजाबमध्ये अकाली दल मोठ्या भावाची भूमिका बजावेल आणि मुख्यमंत्रीही त्यांच्याच पक्षाचा असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. दोन्ही पक्ष मिळून पंजाबमधील सर्व 117 विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार आहेत.

युतीच्या घोषणेला उशीर होण्यामागे दोन्ही पक्षांना केवळ निवडणुकीपुरती नव्हे, तर दीर्घकालीन भागीदारी हवी होती, असंही शहा यांनी सांगितलं. दोन्ही पक्षांमधील मतभेद दूर करून एकत्र काम करण्यासाठी चर्चा करण्यात आली होती.

‘ही नैसर्गिक युती’, नितीन नबिन यांची प्रतिक्रिया

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांनी या युतीचं स्वागत केलं. पंजाब आणि देशाच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप आणि अकाली दलाची युती नैसर्गिक असून, दोन्ही पक्ष मिळून पंजाबमध्ये विकासाभिमुख सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतील, असं ते म्हणाले.

ज्याने देशाला चुना लावला, त्याला परदेशात पाठवलं; सौरव दासला मात्र अडवलं! अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल

दुसरीकडे, अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी ही केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक युती असल्याचं म्हटलं. त्यांचे वडील प्रकाशसिंग बादल आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1996 मध्ये या युतीचा पाया घातल्याची आठवणही त्यांनी करून दिली. पंजाबमधील अमली पदार्थांचं जाळं, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या समस्येवर त्यांनी चिंता व्यक्त केली.

भाजपला 40 जागा मिळणार? जागावाटपाचा तिढा कायम

युतीची घोषणा झाली असली तरी जागावाटपाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. भाजप यावेळी सुमारे 40 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

1996 पासून सप्टेंबर 2020 पर्यंत भाजप आणि अकाली दल एकत्र होते. त्यावेळी पंजाबमधील 117 जागांपैकी अकाली दल 94, तर भाजप 23 जागांवर निवडणूक लढवत होता. या युतीने 1997, 2007 आणि 2012 मध्ये पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली होती.

2020 मध्ये कृषी कायद्यांवरून तुटली होती युती

केंद्र सरकारने 2020 मध्ये आणलेल्या तीन कृषी कायद्यांना पंजाबमधील शेतकऱ्यांचा मोठा विरोध होता. या कायद्यांच्या निषेधार्थ अकाली दलाने भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांनी 2022 ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती.

बेलापूर येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ; 10 जणांवर गुन्हा दाखल

आता सहा वर्षांनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे 2027 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप-अकाली दलाची युती कोणती भूमिका बजावणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us