नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आज (दि.29) सीबीआयच्या न्यायालयीन कोठडीच्या याचिकेवर सुनावणी करताना मुख्यमंत्री केजरीवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता केजरीवाल यांचा मुक्काम 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. (Arvind Kejriwal sent to judicial custody of CBI for 14 days in liquor policy case)
Delhi Court sends Delhi Chief Minister Arvind Kejriwal to Judicial Custody till July 12th in a CBI case related to excise policy matter.
— ANI (@ANI) June 29, 2024
केजरीवाल यांना सीबीआयने 26 जून रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना तीन दिवासांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. याची मुदत आज (दि.29) संपत होती. त्यामुळे केजरीवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आज केजरीवाल यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने केजरीवाल यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांना ट्रायल कोर्टाने 20 जून रोजी दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली.
मोठी बातमी : ‘मराठा आरक्षणा’बद्दल 10 दिवसात मुख्यमंत्री ब्रेकिंग न्यूज देणार; सत्तारांचा गौप्यस्फोट
2 जून रोजी केजरीवालांकडून आत्मसमर्पण
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने 10 मे रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर 2 जून रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यात केजरीवालांनी आंतरिम जामिनाची मुदत सात दिवसांसाठी वाढवण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने केजरीवाल यांचे अपील फेटाळले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी 2 जून रोजी आत्मसमर्पण केले होते.
पक्ष विरोधी कारवाया केल्याने कुंडलीक खाडेंची हकालपट्टी; क्लीप व्हायरल झाल्याने कारवाई दणका
केजरीवालांना 21 मार्च रोजी अटक
ईडीने 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. याआधी त्यांना 9 वेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र या समन्सनंतरही केजरीवाल तपास यंत्रणेसमोर हजर झाले नव्हते. त्यानंतर 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. 22 मार्च रोजी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी ईडीने 11 दिवसांच्या कोठडीत रिमांड घेतला होता. चौकशीनंतर 1 एप्रिल रोजी केजरीवाल यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली.