Download App

केजरीवालांचा ‘आप’ बनला राष्ट्रीय पक्ष, आयोगाचा अनेक दिग्गजांना धक्का

AAP National Party: केंद्रीय निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाला (AAP) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘झाडू’ हेच राहणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC), शरद पवार यांच्या राष्ट्रवादी (NCP) आणि CPI यांनी त्यांचा राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. ईशान्येकडील राज्यांतील पराभवानंतर राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिरावून घेतला गेला आहे.

दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांतील निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. भाजप, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPI), बहुजन समाज पार्टी (BSP), नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) आणि AAP हे आता राष्ट्रीय पक्ष आहेत.

Gandhi Vs Adani : राहुल गांधींचे आरोप! अडाणींने दिले प्रथमच प्रत्युत्तर…

नागालँडमध्ये लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास पासवान) राज्य पक्षाचा दर्जा मिळाला आहे. बंगाल आणि त्रिपुरामध्ये तृणमूल काँग्रेसला राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा कायम राहील. टिपरा मोथा पक्ष त्रिपुरामध्ये राज्य पक्ष म्हणून ओळखला जातो.

आंध्र प्रदेशमध्ये BRS ला राज्य पक्ष म्हणून अवैध ठरवण्यात आले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोकदलाचा राज्य पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. पश्चिम बंगालमधील राज्य पक्ष म्हणून क्रांतिकारी समाजवादी पक्ष रद्द केला. मेघालयात व्हॉइस ऑफ द पीपल पार्टीला राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली.

Tags

follow us