Download App

मोठी बातमी! वक्फ विधेयकाविरुद्ध ओवैसी सर्वोच्च न्यायालयात; संसदेत फाडली होती विधेयकाची प्रत

Asaduddin Owaisi On Waqf Amendment Bill : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने वक्फ (दुरुस्ती) विधेयक2025  मंजूर करून घेतला आहे.

  • Written By: Last Updated:

Asaduddin Owaisi On Waqf Amendment Bill : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने वक्फ (दुरुस्ती) विधेयक2025 (Waqf Amendment Bill 2025) मंजूर करून घेतला आहे. मात्र या विधेयकाला विरोधकांकडून विरोध होत असल्याने वक्फ विधेयकावरुन आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. तर आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी या विधेयक विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे.

ओवैसी यांनी दाखल केलेल्या याचिकेत विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आले आहे. ओवैसी यांची याचिका वकील लजफिर अहमद यांनी दाखल केली आहे. लोकसभेत या विधेयकाच्या चर्चेदरम्यान ओवैसी यांनी वक्फ विधेयकाला विरोध करत विधेयकाची प्रत फाडली होती.

3 एप्रिल 2025 रोजी लोकसभेत (Lok Sabha) वक्फ विधेयक 288  मतांनी मंजूर करण्यात आला होता तर राज्यसभेत (Rajya Sabha) हे विधेयक 128 मतांनी मंजूर करण्यात आला आहे. लोकसभेत या विधेयकाच्या विरोधात 232 आणि राज्यसेभेत 95 मते पडली होती. तर दुसरीकडे किशनगंज येथील काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनीही या विधेयकाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

 तर दुसरीकडे लोकसभेत बुधवारी वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान ओवैसी यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला होता. वक्फ विधेयकाद्वारे मुस्लिमांवर केंद्र सरकार अन्याय करत आहे असा आरोप देखील त्यांनी या चर्चेदरम्यान केला होता. सरकर माझ्या स्वातंत्र्यावर, मशिदीवर, दर्गा, मदरासेवर लक्ष करत आहे. हे विधेयक कलम 14 चे उल्लंघन करते. अतिक्रमण करणारा मालक होईल आणि एक गैर-मुस्लिम वक्फ बोर्डाचे प्रशासन चालवेल. हे विधेयक समानता कायद्याचे देखील उल्लंघन करते अस असदुद्दीन ओवैसी म्हणाले होते.

आयपीएल दरम्यान क्रिकेट विश्वात खळबळ, 9 किलो गांजासह ‘या’ खेळाडूला अटक

follow us