Download App

तब्बल अकरा वर्षानंतर आसाराम बापू पॅरोलवर जेलमधून बाहेर येणार ! पुण्यात घेणार उपचार

Asaram Bapu has been granted seven-day parole by the Rajasthan High Court: आसाराम बापू हे उपचार घेण्यासाठी पुण्यात येणार.

  • Written By: Last Updated:

Asaram Bapu has been granted seven-day parole by the Rajasthan High Court : आश्रमातील मुलीवरील अत्याचार प्रकरणात अजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेले आसाराम बापू (Asaram Bapu) हे तब्बल अकरा वर्षानंतर जेलबाहेर येणार आहेत. त्यांना उपचारासाठी सात दिवसांचा पहिल्यांदा पॅरोल मंजूर करण्यात आलाय. पोलिस बंदोबस्त ते पुणे येथे आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी येणार आहेत. आसाराम बापू हे राजस्थानमधून जोधपूर सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत.

यशराज फिल्म्सच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियन संसदेत यश चोप्रांचे टपाल तिकीट लाँच

आसाराम बापू हे 85 वर्षांचे आहेत. आजारपणात उपचार घेण्यासाठी अनेकदा त्यांनी पॅरोल दाखल केला होता. आता राजस्थान उच्च न्यायालयाने (Rajasthan High Court) त्यांचा अर्ज मंजूर केला आहे. सूरतमधील आश्रमातील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आसाराम बापू यांना गुजरातमधील न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावणी होती. आसाराम बापू हे 2 सप्टेंबर 2013 पासून जेलमध्ये आहेत. कारागृहातून बाहेर येण्यासाठी आणि जामिन मंजूर करण्यासाठी ते अनेक प्रयत्न करत होते. आसाराम बापू यांच्या छातीत दुखःत असल्याने त्यांना जोधपूरमधील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाने उपचारासाठी जामीन मंजूर केलाय. त्यानंतर उपचार घेण्यासाठी पुण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.


भाऊबीज परत घेतली जात नाही; सावत्र भावाची उपमा देत फडणवीसांचं विरोधकांना उत्तर


शिक्षा रद्द करण्यासाठी याचिका

वृद्धापकाळ आणि आजारापणामुळे शिक्षा रद्द करण्यासाठी आसाराम बापू यांनी राजस्थान उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. याविरोधात आसाराम बापू हे सर्वोच्च न्यायालया गेले होते. परंतु कोर्टाने याचिकेत हस्तक्षेप करण्यात नकार दिला होता. आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी ते उच्च न्यायालयात जाऊ शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यावर आता उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.

follow us

संबंधित बातम्या