यशराज फिल्म्सच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियन संसदेत यश चोप्रांचे टपाल तिकीट लाँच
Indian Cinema : ऑस्ट्रेलियन संसदेत भारतीय सिनेमाच्या पहिल्या सादरीकरण्याच्या दरम्यान अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांनी दिवंगत महान चित्रपट निर्माते यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकीटाचे अनावरण केले. हा क्षण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक ऐतिहासिक क्षण होता. या कार्यक्रमात राणी मुखर्जी आणि करण जोहर (Karan Johar) यांनी ऑस्ट्रेलियन संसदेत (Australian Parliament) भाषण देखील दिले.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण दिवंगत यश चोप्रा यांच्या स्मृतीत विशेष टपाल तिकीटाचे अनावरण होते, जे भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्या अमूल्य योगदानाचा आणि हिंदी चित्रपटसृष्टीला एक जागतिक पॉप संस्कृती बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा सन्मान होता. मेलबर्नच्या भारतीय चित्रपट महोत्सवाचे पहिले संरक्षक म्हणून यश चोप्रा यांची ओळख आहे. महोत्सवाशी त्यांचे गाढे संबंध कायम आहेत. या प्रतिष्ठित कार्यक्रमात प्रमुख मान्यवर, संसद सदस्य आणि विविध मंत्र्यांची उपस्थिती भारतीय चित्रपटसृष्टीच्या जागतिक प्रभाव आणि सांस्कृतिक महत्त्वाला अधोरेखित करते.
राणी मुखर्जी यांनी या ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त करताना सांगितले, “ऑस्ट्रेलियन संसदेत महान चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या स्मारक टपाल तिकीटाच्या लाँचचा भाग बनून मला अत्यंत अभिमान वाटत आहे. हा केवळ यश चोप्रा आणि YRF च्या समृद्ध आणि प्रभावी 50 वर्षांच्या वारशाचा उत्सव नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीचा देखील उत्सव आहे ज्याने सिनेमा च्या शक्तीने असंख्य लोकांचे मनोरंजन केले आहे.”
तर यावेळी IFFM च्या संचालिका मितू भौमिक लांगे म्हणाल्या की, आमच्यासाठी ही एक विशेष संध्याकाळ आहे, आज राणी मुखर्जी यांनी यशजींचे टपाल तिकीट लाँच केले. यशजींचे योगदान येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. हा आमच्यासाठी एक प्रतिष्ठित क्षण आहे कारण यशजी आमच्या महोत्सवाचे पहिले संरक्षक होते. असं मितू भौमिक लांगे म्हणाले.
फडणवीसांनी सगळ्यांना पाणी पाजले पण मी त्याला वस्ताद भेटलो; जरांगेंचा बोचरा वार
मेलबर्नचा भारतीय चित्रपट महोत्सव सांस्कृतिक देवाणघेवाणचा एक प्रतीक आहे, जो भारतीय चित्रपटसृष्टीची समृद्ध विविधता आणि सृजनशीलता प्रदर्शित करतो. या वर्षाचा महोत्सव भव्य उत्सव होणार आहे, 12-25 ऑगस्ट 2024 दरम्यान हा कार्यक्रम मेलबर्नमध्ये होणार आहे.