Ausia Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Ausia Games 2026 ) भारताला जणू सोन्याच्या पदकांची माळच मिळाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारताच्या पोरींनी तिरंदाजी सांघिक कंम्पाऊंड प्रकारामध्ये सातवं सुवर्णपदक खेचूक आणलं आहे. चीनच्या संघाचा धुव्वा उडवत भारतीय संघाने थेट वर्ल्ड रेकॉर्ड करीत भारतासाठी सातवं सुवर्णपदक जिंकलंय. भारतीय महिला संघातील चिकिथा तनिपर्थी, प्रितिका प्रदीप, ज्योती सुरेखा वेण्णम यांचा समावेश आहे. या तिघींनीही यंदाच्या स्पर्धेत भारताला सातवं सुवर्णपदक जिंकून दिलंय.
🇮🇳 Gold for Bharat in Compound Women’s Team Archery! 🥇
Heartiest congratulations to Jyothi Surekha Vennam, Prithika Pradeep and Taniparthi Chikitha on winning the Gold Medal at the #AsianGames2026.
A brilliant display of precision, composure and teamwork that has brought another proud moment for Bharat.
#Cheer4Bharat
— Arun Govil (@arungovil12) September 30, 2026
आयची-नागोयामध्ये पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघातील चिकिता तनिपार्थी, पृथिका प्रदीप आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी महिला कंपाऊंड तिरंदाजीत चीनवर 238-234 असा विजय मिळवून विजेतेपद कायम राखले आहे. तसेच भारतीय संघाने विश्वविक्रमदेखील केला आहे.
या विजयामुळे भारताला 2026 च्या स्पर्धांमधील सातवे सुवर्णपदक मिळालं असून ज्योतीने आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिचे चौथे सुवर्णपदक जिंकले, तर चिकिता आणि पृथिका यांनी आपली पहिली सुवर्णपदके पटकावली आहेत. हा शानदार विजय एका अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरीनंतर मिळाला आहे. यामध्ये भारताने दक्षिण कोरियावर 234-233 अशा फरकाने मात केली होती.
दरम्यान, गतविजेत्यांनी अंतिम फेरीत आपल्या एकूण गुणांमध्ये चार गुणांची सुधारणा केली आणि 2014 मध्ये इंचॉन येथे दक्षिण कोरियाने नोंदवलेल्या 238 गुणांच्या जागतिक, आशियाई व आशियाई क्रीडा स्पर्धेतील विक्रमाशी बरोबरी केली. कोरियाने 2014 च्या इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत ही कामगिरी केली होती.
