एशियन गेम्समध्ये भारतीय महिला कबड्डी संघाला गोल्ड मेडल, फायनलमध्ये 37-34 ने इराणचा पराभव
अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य इराणचा ३७-३४ अशा अवघ्या तीन गुणांच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
Gold medal for the Indian women’s kabaddi team : भारतीय महिला कबड्डी संघाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या दमदार खेळाची छाप सोडत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य इराणचा ३७-३४ अशा अवघ्या तीन गुणांच्या फरकाने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. पुष्पा राणाच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भरतोय संघाने सुरूवातीपासूनच आत्मविश्वासपूर्ण आणि आक्रमक खेळ केला. इराणकडून कडवे आव्हान मिळत असताना देखील भारतीय खेळाडूंनी आपल्या रणनीतीवर ठाम सहमत राहत सामन्यावर पकड कायम ठेवली.
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये भारताने आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी कांगोरी केली. भारतीय रेडर्सनी सातत्याने गुण मिळवले, तर बचावपटूंनीही इराणच्या आक्रमणाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मध्यंतरापर्यंत भारताने 22-16 अशी सहा गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. या आघाडीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत होता. मात्र दुसऱ्या हाफमध्ये इराणने आपला खेळ उंचावत जोरदार पुनरागमन केले.
इराणच्या खेळाडूंनी भारताची आघाडी कमी करत सामना पुन्हा रंगतदार बनवला. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही संघांमध्ये प्रत्येक गुणासाठी संघर्ष पाहायला मिळाला. एका क्षणी सामना कोणत्याही संघाच्या बाजूने जाऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र दबावाच्या निर्णायक क्षणी भारतीय महिला संघाने संयम सोडला नाही. महत्त्वाच्या रेड आणि बचावाच्या जोरावर भारताने आपली आघाडी टिकवून ठेवली आणि अखेर 37-34 असा विजय निश्चित करत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
अहिल्यानगरचे सर्व 14 तालुके दुष्काळग्रस्त, सवलतींची संवेदनशीलपणे अंमलबजावणी करा – विखे पाटील
या शानदार विजयानंतर कर्णधार पुष्पा राणाने संघाच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. सामना गमावू असे आम्हाला कोणत्याही क्षणी वाटले नाही आणि सुरुवातीपासूनच सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास होता, असे तिने सांगितले. देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाल्यामुळे खूप आनंद होत असल्याची भावना तिने व्यक्त केली. संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघातील एकजूट शानदार राहिली आणि प्रत्येक खेळाडूने संघाच्या विजयासाठी योगदान दिल्याचेही तिने नमूद केले. इराण मजबूत संघ असल्यामुळे अंतिम सामन्यासाठी विशेष रणनीती आखण्यात आली होती आणि मैदानावर त्याची योग्य अंमलबजावणी करण्यात भारतीय खेळाडूंना यश आले.
या विजयामुळे महिला कबड्डीतील भारताची यशस्वी परंपरा आणखी मजबूत झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कबड्डीचा समावेश झाल्यापासून भारतीय महिला संघाने सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. यापूर्वीही भारतीय महिलांनी या स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आता पुन्हा एकदा इराणसारख्या मजबूत प्रतिस्पर्ध्याला चुरशीच्या अंतिम सामन्यात पराभूत करून भारतीय महिला कबड्डी संघाने सुवर्णपदक पटकावले. दबावाच्या परिस्थितीत दाखवलेला संयम, संघातील एकजूट आणि निर्णायक क्षणी केलेला प्रभावी खेळ या विजयाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली.