Download App

Assam Delimitation : आसाममध्ये विधानसभा, लोकसभेच्या जागा वाढणार; राष्ट्रपतींकडून मंजुरी

आसाम राज्यात आता विधानसभा आणि लोकसभेच्या जागा वाढणार आहेत. कारण आसाममधील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या सीमांकनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्वपूर्ण कामगिरी झाल्याचं बोललं जात आहे.

आसामचे मुख्यमंत्री सरमा ट्विटमध्ये म्हणाले, “आज माननीय राष्ट्रपतींनी आसामसाठी भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिसीमन अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. आसामच्या इतिहासात आज एक महत्त्वाची कामगिरी झाली जय माँ भारती. जय मााअसम.” असं सरमा म्हणाले आहेत.

खोके-खोके ओरडणाऱ्यांकडे ‘कंटेनर’, त्यांनी कोविडही सोडला नाही; राज ठाकरेंचा घणाघात

निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यांच्या सीमा निश्चिती केली जाते. त्यालाच परिसीमन म्हटलं जातं. राज्यात समान लोकसंख्येच्या वर्गांना समान प्रतिनिधीत्व मिळावं यासाठीच परिसीमन केलं जातं. हे परिसीमन मागच्या जनगणनेनूसारच केलं जातं.

दरम्यान, आसाममधील सीमांकनाचा अंतिम आदेश निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला. त्यानंतर आता अनुसूचित जमाती (ST) साठी आणखी तीन विधानसभा मतदारसंघ तर अनुसूचित जाती (SC) साठी आणखी एक मतदारसंघ राखीव ठेवण्यात आला आहे.

Tags

follow us