Download App

Assam Road Accident : आसामात भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू, 27 जण गंभीर

Assam Road Accident : देशभरात रस्ते अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रोज कुठे ना कुठेतरी अपघात (Road Accident) होतात. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी येऊन धडकली आहे. आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात (Assam Road Accident) भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्याला सुरुवात करण्यात आली. गोलाघाट जिल्ह्यातील बलिजन गावात ट्रक आणि बसची धडक होऊन हा अपघात झाला.

या बसमध्ये 45 प्रवासी होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आठखेलिया येथून बोगीबील येथे सहलीला ही बस निघाली होती. पहाटे पाच वाजता बस मार्गेरिटा येथे असताना कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती मात्र चिंताजनक आहे.

Bus Fire Accident : मध्यप्रदेशात अपघातानंतर बस पेटली; 12 जणांचा होरपळून मृत्यू, 14 जखमी

बसमधील सर्व प्रवासी तिनसुकिया येथील तिलंगा मंदिराकडे निघाले होते. जखमींना जोरहाट येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 12 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अपघातातील काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याचाही धोका व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात मध्य प्रदेशातही भीषण अपघात झाला होता. गुना जिल्ह्यात (Bus Accident) कालरात्री डंपर ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या धडकेनंतर बस पेटली आणि या आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. गुना-आरोन रोडवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरची प्रवासी बसला धडक बसली. धडक इतकी जोरात होती की या धक्क्याने बस पलटी झाली आणि बसने पेट घेतला. काय होत आहे हे कळण्याच्या आतच बसला धडक बसून बस पलटली आणि पेट घेतला. आग लागल्यानंतर मात्र बाहेर पडण्यासाठी प्रवासी धडपड करू लागले. चार जण बाहेर पडले पण बाकीचे मात्र बसमध्येच अडकले. त्यानंतर आगीने सगळी बसच कव्यात घेतली होती.

Road Accident : ताम्हिणी घाटात भीषण अपघात! खासगी बस उलटून 2 ठार, 55 जखमी

follow us