Assembly Election 2023 : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे हिंदीपट्ट्यातील राज्यांवर भाजपची सत्ता आली आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेसला (Congress) सत्तेलाही भाजपने सुरुंग लागला आहे. याचबरोबर काँग्रेसची हिंदीपट्ट्यातील राज्यातील सत्ताही राहिलेली नाही. तेलंगणात मात्र काँग्रेसची (BJP) किमया दिसली आहे. काँग्रेसने दहा वर्षांची के. चंद्रशेखर राव सत्ता हटवून हे राज्य जिंकले आहे. लोकसभेची सेमीफायनल भाजपने 3-1 जिंकली आहे. यातून भाजपचा 2024 चे लोकसभेचा ‘रोडमॅप’च स्पष्ट झाला आहे. काँग्रेस नेतृत्वाखाली असलेल्या इंडिया आघाडीसमोर खडतर परिस्थिती असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
मोदींची जादू कायम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू अजूनही कायम असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. राज्यांमध्ये अजूनही नरेंद्र मोदींची नावावर मते मिळतात हे स्पष्ट होत आहे. छत्तीसगडमध्ये मोठा स्थानिक नेता नसताना भाजपने मोदींच्या चेहऱ्यावर हे राज्य काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावले आहे. तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार देण्यात आला नव्हता. राजस्थानमध्ये वसुंधराराजेंसारखा स्थानिक चेहरा होता. परंतु त्यांना फार महत्त्व देण्यात आले नाही. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान हे मुख्यमंत्री असताना मोदींच्या नावावर मते मिळाली आहेत. या राज्यांमध्ये मोदींच्या सर्वाधिक सभा झाल्या आहेत. उत्तर भारतातील हिंदीपट्ट्यामध्ये भाजपची मजबूत पकड असल्याचे दिसून येत आहे. हिंदीपट्ट्यातील राज्यांमध्ये 225 लोकसभा जागा असून, त्यातील तब्बल 177 जागा भाजपने मागील निवडणुकीत जिंकलेल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ सहा जागा जिंकता आलेल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होऊन काँग्रेसला या भागात आपले अस्तित्व दाखविता आलेले नाही.
भाजपची व्होट बँक कायम
राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये भाजपचे व्होट बँक आणि भाजपची पक्षाची यंत्रणा मजबूत असल्याचे दिसून येत आहे. तर छत्तीसगड काँग्रेस राखेल असे एक्झिट पोल अनेक संस्थांचे होते. तसेच मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षात चुरस दाखविण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात हे दोन्ही राज्यात भाजपने आपला करिश्मा दाखविला आहे. भाजपचे कार्यकर्ते हे शेवटच्या मतदारांपर्यंत जातात यातून दिसून येत आहे. तीन महिन्यांपूर्वी कर्नाटक राज्य भाजपने गमविले होते. त्यानंतर पक्षाने जोरदार तयारी करून मुसंडी मारली आहे. त्यासाठी केंद्रात आलेल्या नेत्यांनाही मैदानात उतरविण्यात आले होते. मध्य प्रदेशावर 1960 पासून संघाचा प्रभाव राहिलेला आहे.
वादळी सुरुवातीनंतर टीम इंडियाचा डाव गडगडला, ऑस्ट्रेलियाला 161 धावांचे लक्ष्य
राहुल गांधींच्या जातनिहाय जनगणनेला मतदारांनी नाकारले
काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना केली जाईल, असे राहुल गांधींनी जाहीर केले होते. त्याचा फारसा काही काँग्रेसला उपयोग झाला नाही. मध्य प्रदेशमध्ये भाजपने 230 जागांपैकी एक तृतीयांश जागा जिंकल्या आहेत. त्यात ओबीसींचा प्रभाव असलेल्या 67 जागापैकी भाजपने 49 जागा जिंकल्यात आहे. मागील निवडणुकीपेक्षा वीस जागा भाजपच्या वाढल्या आहेत. त्यामुळे ओबीसी मतदारांनी भाजपलेला सोडलेले नसल्याचे दिसून येत आहे. तसेच जातनिहाय जनगणना करण्यास लोक नाकारत असल्याचे यातून दिसतून येत आहे.
आदिवासींनीही काँग्रेसचा ‘हात’ सोडला !
छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आदिवासी जास्त आहेत. या राज्यातील आदिवासी समाजही भाजपबरोबर आला आहे. छत्तीसगडमध्ये 29 आदिवासी जागा आहेत. त्यातील 18 जागा भाजपने जिंकल्यात. तर मध्य प्रदेश आणि 47 पैकी 27 जागा भाजपकडे आल्यात. तर राजस्थानमधील 25 ैकी 11 जागा भाजपकडे आल्या आहेत. राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती आहे. त्याचा फायदाही भाजपला झाला आहे. 2014 आणि 2019 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत.
मुस्लिम मतदारांनी प्रादेशिक पक्षांची साथ सोडली
तेलंगणाच्या निकालावरून मुस्लिम मतदार हे काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. हा मतदार हे प्रादेशिक पक्षाकडून काँग्रेसकडे जात असल्याचे स्पष्ट होत आहे. कर्नाटक निवडणुकीतही मुस्लिम हे जेडीएसकडून काँग्रेसकडे आले आहे. तेलंगणात 39 मतदारसंघात मुस्लिम मतदार बहुल आहेत. त्यातील बीआरएसला केवळ 18 जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा बीआरएसला 12 जागा मिळाल्या आहेत. तर एमआयएमला तीन जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीपेक्षा एमआयएमची एक जागा कमी झाली आहे. समाजवादी पक्षाचे अखिल यादव आणि तृणमूल काँग्रेसच्या ममत बॅनर्जी यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक व्होट बँक काँग्रसकडे सरकल्यास दोन्ही पक्षासाठी धोका आहे.
Rajasthan Election : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने भाजप-कॉंग्रेसला दिली तगडी फाईट
इंडिया आघाडीतील काँग्रेसची ताकद कमी होणार
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील काँग्रेसची कामगिरीचा फटका आता या पक्षाला बसेल. कारण इंडिया आघाडीमध्ये आता वाटाघाटीमध्ये काँग्रेसला झुकावे लागू शकतात. इंडिया आघाडीत असलेले प्रादेशिक पक्ष हे आपल्या राज्यात लोकसभेच्या जास्त जागा मागू शकतात. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये खटकेही उडू शकतात.
उत्तर-दक्षिणमधील राजकारण
काँग्रेसने कर्नाटकनंतर तेलंगणा हे राज्य जिंकले आहे. त्यामुळे काँग्रेसचे दक्षिणकडील राज्यात बळ वाढत आहेत. हे राज्य आर्थिकदृष्टा मजबूत आहेत. पण सत्तेतील भाजपला दक्षिणेतील मतदार नाकारतात हे ही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत उत्तर व दक्षिण भागातील राजकारण असेच राहू शकते.
महिला मतदार भाजपच्या पाठीशी
मध्य प्रदेशमध्ये महिला मतदारही भाजपच्या पाठीशी आहेत. ‘लाडली बहेना’ ही योजना लागू केली जाईल, असा जाहीरनामा भाजपचा होता. या योजनेतून थेट पैसे महिलांच्या खात्यात देण्यात येणार आहे. त्याचा फायदा भाजपला झाला आहे. या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या दोन टक्क्यांनी वाढली आहे.