Download App

अहंकारी आघाडीने आता तरी सुधरावं, नाहीतर जनता साफ करेल; पंतप्रधान मोदींचा इशारा

  • Written By: Last Updated:

PM Narendra Modi : आज पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. तेलंगणा वगळात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये (Rajasthan, Chhattisgarh Elections) भाजपने कॉंग्रेसला पराभूत केलं. या निकालावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींन (Narendra Modi) भाष्य केलं. आजचा निकाल हा भाजपने (BJP) भ्रष्टाचाराविरुध्द जे जन आंदोलन सुरू केलं, त्याला मिळालेला प्रतिसाद आहे. त्यामुळं आता तरी सुधरा… नाहीतर ही जनता तुम्हाला साफ करून टाकेल, असा इशारा त्यांनी दिला.

वादळी सुरुवातीनंतर टीम इंडियाचा डाव गडगडला, ऑस्ट्रेलियाला 161 धावांचे लक्ष्य 

तीन राज्यांतील अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत विजय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी बोलतांनी म्हणाले, निवडणूक निकालांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. देशातील तरुणांना विकास हवा आहे. जिथे सरकारनं तरुणांच्या विरोधात काम केले आहे, तिथे सरकारे सत्तेबाहेर फेकली गेली. राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणात सत्ताधाऱ्यांना मतदारांनी जागा दाखवली. ही सर्व सरकारे भ्रष्टाचारात पुढे होती. पेपरफुटी आणि नोकरभरती घोटाळ्यात मग्न होती, आजचे निकाल हे विकासाच्या विरोधात जे उभे राहताच, त्यांना इशारा आहे. कोणत्याही विकासाच्या मुद्द्याला काँग्रेसकडून विरोध होता. विकासाच्या मुद्याची खिल्ली उडवली जाते. आज अशा सगळ्या पक्षांना मतदरांनी इशारा दिलाय की, सुधरा… नाहीतर जनता साफ करून टाकेल, असा दम मोदींनी दिला.

Rajasthan Election : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने भाजप-कॉंग्रेसला दिली तगडी फाईट 

ते म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला. काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीसाठी हा धडा आहे. काही घराणेशाही मानणाऱ्या कुटुंबांना एकत्र करून फोटो चांगला येईल, मात्र, जनतेचा विश्वास जिंकता येत नाही. त्यासाठी राष्ट्रसेवेच वसा पाहिजे. मात्र, कॉंग्रेसमध्ये किंबहूना अंहकारी आघाडीमध्ये तो वसा नाही. शिव्या, निराशा आणि नकारात्मका या गोष्टी अहंकारी आघडीला मीडियाचाी हेडलाईन मिळेल, पण लोकांच्या मनात स्थान मिळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसने आदिवासी समाजाला मागे खेचले. काँग्रेसच्या धोरणांमुळे आदिवासी समाज सात दशके मागे राहिला. ज्या काँग्रेसने आदिवासींना कधीच विचारले नाही, ती काँग्रेस नेस्तनाबूत झाली. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही हीच भावना पाहायला मिळाली. या आदिवासी बहुल भागात काँग्रेसचा सफाया झाला, अस मोदी म्हणाले.

ते म्हणालेले भाजप सरकार फक्त योजना बनवत नाही. तर प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. स्वार्थ काय आहे आणि राष्ट्रहीत काय आहे, हे मतदार ओळखून आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी खोटी आश्वासनं देणं, हे मतदारांना आवडत नाही, असंही मोदी म्हणाले.

 

follow us