Rajasthan Election : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने भाजप-कॉंग्रेसला दिली तगडी फाईट

  • Written By: Published:
Rajasthan Election : एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने भाजप-कॉंग्रेसला दिली तगडी फाईट

Rajasthan Assembly Election Results 2023 : गेल्या काही वर्षांत राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपची सत्ता आलटून-पालटून येते. त्यामुळं यंदा सत्ता कायम राखणं हे भाजपसाठी आव्हानात्मक होतं. मात्र, आता निकाल समोर आले असून राज्यात भाजप विजयी झाला. भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपने ११३ जागांवर विजय मिळवला. तर कॉंग्रेसचे ६४ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र सिंह गुढा (Rajendra Singh Gudha) यांचा दारून पराभव झाला.

Rajasthan Election : एकनाथ शिदेंच्या उमेदवाराची भापज-कॉंग्रेसला दिली तगडी फाईट 

कॉंग्रेसला रामराम ठोकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी उदयपुरवाटी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे. एकनाथ शिंदे स्वतः थेट राजस्थानमध्ये गुडांच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी गुढा यांचा जोरदार प्रचार केला. मात्र, गुढा यांचा पराभव झाला. त्यांनी 57101 मते मिळाली. तब्बल १०,०८२ मतांनी कॉंग्रेसचे उमेदवार भगवना राम सैनी यांनी गुढा यांचा पराभव केला.

उदयपुरवाटी मतदार संघातून भगवना राम सैनी यांनी ६७,१८३ मते मिळाली. तर भाजपचे सुभकरन चौदरी यांनी ६६,७६४, विकास गिल ९०४, रामसिंग यांनी ८०९, संदीप सैनी ७२० मते मिळाली.

‘आता लोकसभेतही भाजपच’; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास 

२०१८ च्या निवडणुकीत भाजपचा येथे बसपाशी सामना झाला आणि मायावतींचा ‘हत्ती’ विजयी झाला. राजेंद्र सिंह गुढा यांनी २०१८ मध्ये बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

राजस्थानमध्ये भाजपने कॉंग्रेसला चांगलाच पराभव दाखवला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची एकाकी लढाई अयशस्वी ठरली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा, मुस्लिमबहुल मतदारसंघात यशस्वी ध्रुवीकरण आणि गुर्जर, जाट आणि राजपूत यांसारख्या प्रमुख जातींची अनुकूलता यामुळे भाजपला पुन्हा सत्ता मिळवण्यात मदत झाली. भाजपच्या विजयाने राजस्थानी मतदारांनी दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा सुरू ठेवली. दरम्यान, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube