‘मोदी सरकार सहा महिन्यांत जाणार?’ संजय राऊतांचं मोठं भाकीत; CJP आंदोलनावरूनही केला घणाघात

Sanjay Raut on CJP Protest and Modi; CJP आंदोलन आणि तुषार गांधी यांच्या अटकेवरून संजय राऊत यांनी मोदी-शाह सरकारवर निशाणा साधला.

Sanjay Raut on CJP Protest and Modi-Shah Government

Sanjay Raut on CJP Protest and Modi-Shah Government: दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. CJP आंदोलन हा केवळ एका संघटनेचा विषय नसून देशाच्या लोकशाहीशी संबंधित प्रश्न असल्याचं राऊत यांनी म्हटलं. देशात आणीबाणीसदृश परिस्थिती असल्याचा आरोप करत, “मोदी-शाह यांचं सरकार घाबरलं आहे,” अशी टीका त्यांनी केली. तसेच, दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार असून यापुढे दिल्लीत होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होण्याची घोषणाही त्यांनी केली.

ब्रेकिंग: अभिजीत दिपकेची सुटका; दिल्ली पोलिसांना न्यायदंडाधिकाऱ्यांनी झापलं, नेमकं काय घडलं?

CJP आंदोलनावरून केंद्र सरकारवर टीका

दिल्लीतील आंदोलन आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या घटनांवरून संजय राऊत यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. देशात लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री आणि खासदारांनाही ताब्यात घेतलं जात असल्याचा दावा करत, देशात पोलिसांचं आणि डिटेन्शनचं राज्य सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

देशात आणीबाणीसदृश परिस्थिती असल्याचं मान्य केलं पाहिजे, असं राऊत म्हणाले. हिटलरच्या अखेरच्या काळातील परिस्थितीचा दाखला देत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकार सैन्यबळाचा वापर करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपमध्ये अंतर्गत खदखद असल्याचा दावा

भाजपमध्ये अंतर्गत मतभेद वाढत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. पक्षात दुफळी-तिफळी निर्माण झाली असून, अनेक मोठे नेते वेगळी भूमिका घेण्याच्या मनःस्थितीत असल्याचं ते म्हणाले. भाजपचे काही वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका मोठ्या नेत्याचाही कल वेगळा असल्याचा दावा त्यांनी केला.

‘मोगॅम्बो मोदी लोकशाही उद्ध्वस्त करतायत, आपण मिळून मोदींचा पराभव करू’, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मोदी सरकारच्या भवितव्याबाबतही राऊत यांनी भाकीत केलं. सहा ते सात महिन्यांनंतर मोदी सरकार सत्तेत दिसणार नाही, असा दावा त्यांनी केला. मात्र, या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत.

तुषार गांधींच्या अटकेवरून फडणवीसांना लक्ष्य

मुंबईतील आंदोलनादरम्यान महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावरूनही संजय राऊत यांनी टीका केली. तुषार गांधी यांना अटक केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

तुषार गांधी यांना लॉकअपमध्ये ठेवता येणार नसल्याचं सांगतानाच, त्यांची वैद्यकीय तपासणी आणि त्यांना तेथून हलवण्याच्या प्रक्रियेबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप राऊत यांनी केला. आपण पोहोचण्यापूर्वी तुषार गांधी यांना मागच्या दरवाजाने हलवण्यात आलं, तसंच सांताक्रूझला नेणार असल्याचं सांगून त्यांना बोरिवलीला नेण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजपच्या निधीवरूनही सवाल

भाजपला मिळणाऱ्या निधीवरून संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. भाजपला निधी कोणी दिला, हे एलन मस्क यांनी सांगावं, अशी मागणी त्यांनी केली. भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांकडून भाजपला निधी मिळाल्याचा आरोप करत, चीनमधील कंपन्यांनीही निधी दिला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मतचोरीसाठी अवैध मार्गाने पैसे गोळा केल्याचा आरोपही त्यांनी केला. पीएम केअर्स फंडात सर्वाधिक रक्कम कोणी दिली, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, जंतर-मंतरवर सीजेपीचा पुन्हा आंदोलनाचा निर्धार, आज काय घडणार?

दिल्लीत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार

राहुल गांधी यांच्या आवाहनानुसार सोमवारी आंदोलनाबाबत चर्चा सुरू असल्याचं राऊत यांनी सांगितलं. आपण स्वतः आज संध्याकाळी दिल्लीला जाणार असल्याचं जाहीर करत, यापुढे दिल्लीत होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नावरूनही सरकारवर टीका

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही संजय राऊत यांनी भाजप सरकारवर टीका केली. भाजपच्या राजवटीत दुष्काळग्रस्तांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले. आमदार विकत घेणाऱ्या आणि पक्ष फोडणाऱ्यांनाच न्याय मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

केंद्र सरकारचा हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न; तमिळनाडूत ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचा घणाघाती आरोप

दरम्यान, CJP आंदोलन, तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्याचा मुद्दा आणि भाजपमधील कथित अंतर्गत मतभेदांवर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

follow us