Download App

Congress : ‘सोलापूर, माढा जिंकायचं अन् राहुल गांधींना पंतप्रधानपदी बसवायचं’ : पटोलेंनी सांगितलं 2024 चे टार्गेट

Nana Patole : देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना टक्कर देणारा आणि पंतप्रधानपदाचा विरोधी उमेदवार कोण याची चर्चा होत असताना आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नावच जाहीर करून टाकले. पटोले म्हणाले, आम्हाला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंतप्रधान करायचे आहे. राहुल गांधी 2024 मध्ये पंतप्रधान होतील असा संदेश आम्ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून देत आहोत.

सोलापुरात आज काँग्रेसचा महामेळावा पार पडला. यावेळी राज्यातील काँग्रेस पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. तसेच काँग्रेसचा आगमी काळातील काय प्लॅन आहे हे सुद्धा सांगितले.

‘राष्ट्रवादी मोठा भाऊ, रोहित पवार म्हणतात आम्ही तर ट्विन्स’; नेमका रोख कुणाकडे?

ते पुढे म्हणाले, सरकारने नुकत्याच घेतलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयावर आगपाखड केली. सध्याचं सरकार हे घोषणाबाज सरकार आहे. लोकांच्या खिशातील पैसे काढायचे हे मोदी सरकारने ठरवलंच आहे. केंद्र सरकार देश विकून खात आहे. इंग्रजांना हाकललं तसं आता भाजपला हाकलायची वेळ आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा आमदार निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) हे खासदार असले पाहिजेत, असं तु्म्ही म्हणता. पण, ते निवडणूक लढायला तयार नाहीत, असं त्यांनीच मला कानात सांगितलं. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ते लढतीलही. पण, ते बहुमताने निवडून आले पाहिजेत, ही जबाबदारी तुम्ही घ्या.

आपल्याला सोलापूर लोकसभेची जागा तर जिंकायचीच आहे. त्याबरोबरच माढ्याचीही जागा जिंकायची आहे. कारण, राहुल गांधी यांना आता पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी मला तुमची हमी पाहिजे आहे, असे पटोले म्हणाले.

Rahul Gandhi : नवीन संसद भवनाचे उद्घाटन मोदींनी नाही तर राष्ट्रपतींनी करावे

Tags

follow us

वेब स्टोरीज