‘राष्ट्रवादी मोठा भाऊ, रोहित पवार म्हणतात आम्ही तर ट्विन्स’; नेमका रोख कुणाकडे?

‘राष्ट्रवादी मोठा भाऊ, रोहित पवार म्हणतात आम्ही तर ट्विन्स’; नेमका रोख कुणाकडे?

Rohit Pawar on Ajit Pawar’s Statement : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. संख्याबळाच्या आधारे महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादी मोठा पक्ष ठरला आहे. यावरून अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य करताच त्यांच्यावर टीकेची झोड उठली. मात्र, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी वेगळे मत मांडले आहे.

रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडीत मतभेद नक्कीच नाहीत. मनभेदही नाहीत. दादा बोलत असताना आकड्यांवर बोलतात. राष्ट्रवादीचा आकडा काही पक्षांपेक्षा जास्त आहे. तो आकडा पाहून मोठा भाऊ सहाजिकच आहे बोलणं. जेव्हा निवडणूक लढविली जाते तेव्हा आपण एकाचवेळी जन्मलेलो ट्विन्स आहोत. आपण एका विचाराने जेव्हा भाजपविरोधात लढत असतो तेव्हा तितकीच ताकद लावणं महत्वाचं आहे.

आता काँग्रेस नाही राष्ट्रवादीच मोठा भाऊ; जागावाटपाच्या मुद्द्यावर अजितदादांचा पटोलेंना चिमटा

अजित पवार काय म्हणाले ?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. ताकद जास्त असेल तर आघाडीत महत्व टिकेल. याआधी काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. त्यामुळे वाटाघाटी करताना राष्ट्रवादी काँग्रेसला लहान भावाची भूमिका घ्यावी लागायची. आता परिस्थिती वेगळी आहे. राज्यात सध्या काँग्रेसच्या 44 जागा आहेत तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. त्यामुळे आता आम्ही मोठे भाऊ आहोत.

दरम्यान, याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत ज्या जागा जिंकल्या आहेत त्या आमच्याच राहणार असल्याचे म्हटले होते. म्हणजे, त्या जागांवर थेट दावा सांगितला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते की जागावाटपाबाबत अजून काहीच ठरलेलं नाही. यासाठी तिन्ही पक्ष व आघाडीतील अन्य घटक पक्षांचे प्रमुख बसून चर्चा करू. प्रत्येकाला आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तसा तो संजय राऊत यांनाही आहे.

कोणताही फॉर्म न भरता 2000 च्या नोटा बदलता येणार; SBI ने काढले पत्रक

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube